परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार पाच वर्षापासून फरार होता त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसानी दि. 9 जुन रोजी मुसक्या आवळल्या. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशान्वे व पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यामध्ये होत असलेल्या घरपोडीचे गुन्हे उघड करण्यास कर्तव्यावर होते.दरम्यान गुप्त माहितीनुसार त्याना अट्टल दरोडेखोर बबड्या बापूराव भोसले राहणार तांडपागरी हा लिंबा गावाकडे जाताना सापळा लावुन अटक केली. पीएसआय चंदनसिंग परिहार, पोलीस अमलदार महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, गजानन शिरसागर, शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार महिला अंमलदार जयश्री आव्हाड, चालक उत्तम हनवते असे शासकीय वाहनाने पथक पेट्रोलिंग करत असताना मौजे उक्कडगाव शिवार येथे आले.

या ठिकाणी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की पोलीस स्टेशन दैठणा व पुण्याच्या पोलीना पाहिजे असलेला अट्टल गुन्हेगार सचिन उर्फ बबड्या बापूराव उर्फ बाळू भोसले राहणार ताडपांगरी हा लिंबा गावाकडे मोटरसायकलवर जातो. या माहितीवरून सदर आरोपी यास सापळा रचून पकडले. पकडताना तो पळून जात असताना मोटरसायकल वरून पडून त्यास किरकोळ जखमा झाल्या. पोलिसांनी त्यास प्रथम उपचार करून ताब्यात. ताब्यात घेऊन विश्वास संपादन करत विचारपूस केली. त्यांनी गंगाखेड सोनपेठ, पालम तसेच पूर्णा तालुक्यामध्ये व परळी तालुक्यामध्ये त्याचे साथीदार जायक्या तुकाराम शिंदे राहणार बार्शी , सुर्या उर्फ श्रीकांत चव्हाण , छोटा मोहन भोसले यांचे सोबत घरफोड्या केल्या असल्याचे सांगितले. गुन्हातील चोरी केलेला मुद्देमाला पैकी त्याचे एकूण अडीच तोळे सोने, चांदीचे दागिने व नगदी रुपये 4 लाख 22 हजार 558 रूपयाचा नगदी मुद्देमाल काढून दिला.
जिल्ह्यातील एकूण पाच गुन्हे उघडकीस आले. सदर आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून त्यास पुढील कार्यवाहीस्तव वैद्यकीय उपचार करून पोलीस स्टेशन गंगाखेड येथे ताब्यात देण्यात आले.स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय चंदनसिंग परिहार, पोलीस अमलदार महेश कवठाळे, राहुल परसोडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, गजानन शिरसागर, शरद सावंत, दिलीप निलपत्रेवार महिला अंमलदार जयश्री आव्हाड, चालक उत्तम हनवते या टिमने अट्टल गुन्हेगारास पकडण्यासाठी केलेले धाडस कौतुकास्पद ठरले.






















