Homeताज्या बातम्या२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’...

२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा वापर करण्याचे निर्देश

दौंड (प्रतिनिधी तुषार शेटे):संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा आंतरराष्ट्रीय विधवा दिन संपूर्ण महाराष्ट्रात “एकल महिला दिवस” म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश आज बैठकीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच हा दिवस साजरा करत असताना महाराष्ट्राच्या धोरणाप्रमाणे विधवा या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ ही सन्मानजनक संज्ञा वापरावी अशाही सूचना दिल्या आहेत.

राज्य शासनामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे, या पार्श्वभूमीवर आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या माध्यमातून या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतींमध्ये एकल महिला दिन साजरा करावा. या कार्यक्रमासाठी गावातील किंवा शहरातील सर्व एकल महिलांना सन्मानाने निमंत्रित करावे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे २०० वे जयंती वर्ष साजरे करावे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची उपस्थित महिलांना माहिती द्यावी, रोजगार, स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधींबाबत चर्चा करून बचतगटात नसलेल्या महिलांना बचतगट चळवळीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

आपल्या गावात / शहरात एकल महिलांना रूढी परंपरांच्या आधारावर अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही याबाबत ठराव मंजूर करण्यात यावा, राज्य शासनाच्या प्रस्तावित एकल महिला धोरणामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा याविषयी महिलांची मते, सूचना व आक्षेप जाणून घ्यावेत, याबाबत शासनाकडे अहवाल पाठवावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त डॉ. माधवी सरदेशमुख, पुणे आयुक्त डॉ. जगदीश मणियार, सहसचिव श्री. वी. रा. ठाकूर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विकासाच्या गजरात हरवलेला माणूस : भारताच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह!

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): भारत प्रगतीच्या वाटेवर असल्याचे दावे रोज ऐकायला मिळतात. तंत्रज्ञान, उद्योग, महामार्ग, डिजिटल क्रांती यांची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. मात्र...

गुळवंच येथे परंपरागत कृषि विकास योजनेअंतर्गत शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): परंपरागत कृषि विकास योजना (पीकेव्हीवाय) अंतर्गत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे शेतकरी गट निर्मिती व मार्गदर्शन कार्यक्रम...

“महा-उपलब्धी” मोबाईल ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या सेवा; शासनाचा डिजिटल प्रशासनाकडे महत्त्वपूर्ण टप्पा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी "महा-उपलब्धी" हे एकात्मिक मोबाईल ॲप सुरू करण्याचा निर्णय घेतला असून ते...

योग : भारतीय संस्कृतीचा अमर वारसा आणि आधुनिक जीवनाची संजीवनी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): मानवाच्या जीवनप्रवासात शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल राखण्याची कला म्हणजे योग. हजारो वर्षांपूर्वी भारतभूमीत जन्माला आलेली ही जीवनपद्धती आज...

दौंड शहरात ट्रिपल सीट दुचाकीस्वारांवर पोलिसांची धडक कारवाई; १८ वाहनांवर दंडात्मक कारवाई

0
दौंड( प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): पोलीस निरीक्षक हेमंत शेडंगे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या...

error: Content is protected !!