Homeताज्या बातम्यानिर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता....

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता. जामनेर

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक वर्षात शिक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी समितीने एक उल्लेखनीय सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
श्रीमती आक्कासाहेब प्रभावती गजाननराव गरूड माध्यमिक विद्यालय, बेटावद बु. येथील ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाहीत तसेच भूमिहीन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना समितीने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, वार्षिक शालेय फी तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धांसाठी जाण्या-येण्याचा खर्च, खेळ साहित्य व आवश्यक मदतही समितीकडून देण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही समितीने स्वीकारली आहे.
गावातील मुलांसाठी अभ्यासिका उपलब्ध असताना मुलींसाठीही सुरक्षित व सुसज्ज अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय समितीने घेतला असून हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
निर्भय सेवा समितीचे अध्यक्ष मा. सचिनभाऊ शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्याध्यापक श्री. एस. आर. निकम यांच्याकडून पात्र विद्यार्थ्यांची यादी प्राप्त केली असून लवकरच सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना मदतीचे वितरण करण्यात येणार आहे.
या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल विद्यालयाच्या वतीने तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने निर्भय सेवा समितीचे अध्यक्ष मा. सचिनभाऊ शर्मा आणि सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

error: Content is protected !!