Homeताज्या बातम्यातांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

डॉ. प्रदीप राठोड
प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली !

छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व माजी प्राचार्य तसेच वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शिक्षणविश्वावर शोककळा पसरली आहे. शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून आयुष्यभर निस्वार्थ भावनेने कार्य करणारा एक ध्येयवेडा शिक्षणपुरुष काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने बंजारा समाज, भटक्या-विमुक्त समाज, शिक्षणक्षेत्र आणि पुरोगामी सामाजिक चळवळींची मोठी हानी झाली असून, त्यांनी निर्माण केलेली पोकळी सहज भरून निघणारी नाही.

प्राचार्य राजाराम राठोड यांचा जीवनप्रवास हा संघर्षातून उभ्या राहिलेल्या ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी इतिहास आहे. ग्रामीण आणि वंचित समाजजीवनातील वास्तव त्यांनी जवळून अनुभवले होते. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांपर्यंत ज्ञानाची दारे खुली करणे, हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय मानले. तरुण वयात राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांच्यावर पुरोगामी, समाजवादी आणि लोकशाही मूल्यांचे संस्कार झाले. याच वैचारिक जडणघडणीने त्यांच्या संपूर्ण सार्वजनिक जीवनाला सामाजिक समता, शिक्षणनिष्ठा आणि परिवर्तनवादी दृष्टिकोनाची भक्कम दिशा दिली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या प्रेरणेने त्यांनी १९७२ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे *’वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ’* आणि *’वसंतराव नाईक महाविद्यालया’* ची स्थापना केली. या संस्थेचे ते संस्थापक प्राचार्य होते. वाडी-वस्ती, तांड्यांवरील, ग्रामीण भागातील, भटक्या-विमुक्त, बंजारा तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हा या संस्थेच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू होता.

सुरुवातीला कला व वाणिज्य शाखांपासून सुरू झालेली ही संस्था पुढे विज्ञान आणि इतर आधुनिक अभ्यासक्रमांनी समृद्ध होत गेली. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पसरविण्याचे ऐतिहासिक कार्य या संस्थेने केले.
शिक्षणाचा उद्देश सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि समान संधी मिळवून देण्याचे एक मोठे साधन आहे, यावर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी केवळ शिक्षणसंस्था उभारल्या नाहीत, तर त्या वंचितांच्या आशा-आकांक्षांचे केंद्र बनतील, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आज प्रशासन, शिक्षण, उद्योग, सामाजिक क्षेत्र आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या दूरदृष्टीचा आणि प्रेरणेचा मोठा वाटा आहे.

मराठवाड्याच्या सामाजिक इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीतही प्राचार्य राठोड यांनी सक्रिय भूमिका बजावली. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर निवडून आल्यानंतर त्यांनी नामांतराच्या प्रश्नावर सामाजिक न्यायाची ठाम भूमिका मांडली. गुणवंत, होतकरू आणि वंचित पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासह अध्यापन आणि संशोधनाच्या क्षेत्रात संधी उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या दृष्टीने शिक्षणसंस्था म्हणजे केवळ ज्ञानदानाची केंद्रे नव्हती; ती सामाजिक परिवर्तनाची प्रयोगशाळा होती.

प्राचार्य राठोड यांचे व्यक्तिमत्त्व विद्वत्ता, साधेपणा, शिस्त, संवेदनशीलता आणि माणुसकी यांचा सुंदर संगम होते. त्यांची मृदू वाणी, समतोल विचार, संयमी स्वभाव आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन यांमुळे ते सर्व स्तरांतील लोकांमध्ये आदराचे स्थान मिळवून होते. स्वर्गीय वसंतराव नाईक, स्वर्गीय सुधाकरराव नाईक, स्वर्गीय उत्तमराव राठोड, पद्मश्री रामसिंगजी भानावत आणि बाबूसिंगभाऊ राठोड यांसारख्या अनेक मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते; परंतु या संबंधांचा त्यांनी कधीही वैयक्तिक लाभासाठी उपयोग केला नाही. समाजहित आणि शिक्षणसेवा हेच त्यांच्या आयुष्याचे खरे केंद्रबिंदू राहिले.

ते एक संवेदनशील लेखक, अभ्यासू विचारवंत आणि समाजप्रबोधनाची जाणीव असलेले शिक्षणतज्ज्ञ होते. बंजारा समाजाचा इतिहास, संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक उन्नती या विषयांवर त्यांनी सातत्याने विचारमंथन केले. त्यांच्या सहवासातून अनेक शिक्षक, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते घडले. प्रा. मोतीराज राठोड आणि प्रा. जवाहर राठोड यांसारख्या साहित्यिकांच्या वैचारिक जडणघडणीत त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रभाव मानला जातो.

त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित अमृत महोत्सव आणि नागरी सत्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक योगदानाचा गौरव केला. तो केवळ एका व्यक्तीचा सन्मान नव्हता, तर शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविणाऱ्या एका आयुष्यभराच्या तपश्चर्येचा गौरव होता.

प्राचार्य राजाराम राठोड यांनी आयुष्यभर प्रसिद्धी, पद किंवा वैयक्तिक श्रेय यांचा कधीही हव्यास धरला नाही. शिक्षणाचा अधिकार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, वंचितांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करणे आणि पुरोगामी विचारांची मशाल प्रज्वलित ठेवणे, हेच त्यांच्या जीवनकार्याचे सार होते. त्यांनी उभारलेल्या संस्था, घडविलेल्या विद्यार्थ्यांच्या पिढ्या, रुजविलेली सामाजिक मूल्ये आणि शिक्षणाविषयीची त्यांची निष्ठा हा त्यांचा खरा आणि चिरंतन वारसा आहे.

आज प्राचार्य राजाराम राठोड सर देहरूपाने आपल्यात नसले,तरी त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था, घडविलेल्या विद्यार्थ्यांच्या असंख्य पिढ्या, रुजविलेली पुरोगामी मूल्ये आणि समाजपरिवर्तनाची त्यांची अखंड तळमळ हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे स्मारक आहे. ज्ञान, समता आणि सामाजिक बांधिलकीचा त्यांनी प्रज्वलित केलेला दीप भविष्यातील पिढ्यांनाही मार्गदर्शन करत राहील. शिक्षणाला मानवमुक्तीचे साधन मानणाऱ्या या थोर शिक्षणमहर्षीला विनम्र अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐🙏
डॉ. प्रदीप राठोड स्त्रीरोग तज्ञ गेवराई

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत

0

पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]

पुणे महानगरपालिकेत ४१ कोटींचा ‘झाडू’ घोटाळा; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, खोट्या सर्वेक्षणातून जुन्याच ठेकेदारांवर...

0
घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; 'एका ठेकेदाराला दोनच कामे' हा नियम धाब्यावर, ६९०५ किलोमीटरच्या फुगवलेल्या...

error: Content is protected !!