Homeताज्या बातम्यापरसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात परसबाग प्रकल्पांतर्गत भाजीपाला लागवड उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात शिक्षक, पालक, महिला बचत गटाच्या सदस्यांसह ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग घेत लोकसहभागाचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.

विद्यालय परिसरात ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी तसेच विविध पालेभाज्यांची लागवड करण्यात आली. आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून मिळावी, शेतीबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी आणि सेंद्रिय शेतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे विद्यालय प्रशासनाने सांगितले.

लागवडीनंतर विद्यार्थ्यांना पिकांची नियमित निगा, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण तसेच सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यालय परिसरात उत्पादित होणारा ताजा व पौष्टिक भाजीपाला विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी तसेच विविध शालेय उपक्रमांसाठी वापरण्याचा मानसही यावेळी व्यक्त करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी परसबाग प्रकल्पाचे कौतुक करत शिक्षणासोबत शेतीचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. पर्यावरण संवर्धन, स्वावलंबन आणि पोषण सुरक्षा या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यालय प्रशासनाने या उपक्रमात सहकार्य करणाऱ्या शिक्षक, पालक, महिला बचत गट सदस्य आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त करत भविष्यातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

मनाई क्षेत्रात संशयास्पद वावर; वरणगाव आयुध निर्माणी परिसरात घुसलेल्या दोघांविरुद्ध गंभीर गुन्हा

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) परिसरातील अतिसंवेदनशील व मनाई क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश करून संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांविरुद्ध वरणगाव पोलीस...

error: Content is protected !!