Homeताज्या बातम्याशालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना धुळे येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे.
तपास यंत्रणेकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शालार्थ प्रणालीमध्ये बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोंदींना मंजुरी देऊन शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शशिकांत हिंगोणेकर जळगाव येथे कार्यरत असताना काही शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नोंदींना नियमानुसार पडताळणी न करता मंजुरी देण्यात आल्याचा संशय आहे. यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता तपासली जात असून, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक विविध कागदपत्रांची छाननी आणि संबंधितांची चौकशी करत आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, प्रशासकीय मंजुरी तसेच संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या कथित घोटाळ्याचे नेमके स्वरूप आणि जबाबदार व्यक्तींबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तपासाच्या आधारे आणखी काही अधिकारी किंवा संबंधित व्यक्तींवरही कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
या कारवाईनंतर शिक्षण विभागातील शालार्थ प्रणालीतील मंजुरी प्रक्रिया, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा सर्वंकष तपास करत असून, दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

मनाई क्षेत्रात संशयास्पद वावर; वरणगाव आयुध निर्माणी परिसरात घुसलेल्या दोघांविरुद्ध गंभीर गुन्हा

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी (ऑर्डनन्स फॅक्टरी) परिसरातील अतिसंवेदनशील व मनाई क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश करून संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांविरुद्ध वरणगाव पोलीस...

error: Content is protected !!