Homeताज्या बातम्याविंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी

निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात छोटा हत्ती वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील कांदा मालक गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पिंपळस – येवला राज्य महामार्गावरील सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामामुळे निर्माण झालेल्या एकेरी वाहतुकीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाकद येथील एम.एच ४३ बी.बी ०३१० क्रमांकाचा छोटा हत्ती कांदा विक्रीसाठी विंचूर येथील माऊली वजन काटा व पेट्रोल पंपाजवळून जात असताना समोरून येणाऱ्या छत्तीसगड येथील सी.जी २९ ए.जी ५४७३ क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या १६ टायर ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात छोटा हत्तीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, छोटा हत्ती सुमारे दहा फूट फरफटत जाऊन रस्त्याच्या कडेला उलटला. अपघातात या वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात छोटा हत्ती चालक ज्ञानेश्वर दगडू शिंदे, रा.वाकद यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या शेजारी बसलेले कांदा मालक शरद विठ्ठल गायकवाड हे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमीला बाहेर काढून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात रवाना केले.
घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृत ज्ञानेश्वर शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बाळासाहेब कांदळकर करीत आहेत.
सध्या पिंपळस – येवला राज्य महामार्गाचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्याने विंचूर परिसरात अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. अरुंद मार्ग, मोठ्या वाहनांची वाढती वर्दळ आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रकारांमुळे या परिसरात वारंवार अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या मार्गावर तातडीने प्रभावी वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादेची अंमलबजावणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन

0
सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन विष्णु गायकवाड (तालुका प्रतिनिधी गेवराई) गेवराई, दि. ३१ (प्रतिनिधी) नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध...

error: Content is protected !!