Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते टाकळगाव बॅरेजचे भूमिपूजन संपन्न

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते टाकळगाव बॅरेजचे भूमिपूजन संपन्न

सिंदफणा नदीवरील सात बॅरेजच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांना बोलणार—- सुनेत्राताई पवार
अमरसिंह आणि आ. विजयसिंह पंडित यांनी शब्द पाळला

विष्णु गायकवाड तालुका (प्रतिनिधी गेवराई) दि. ३१ (प्रतिनिधी)
सिंदफणा नदी पाणीदार करण्यासाठी अमरसिंह पंडित आणि आ. विजयसिंह पंडित प्रयत्नशिल आहेत . हिंदीचा नदीवरील उर्वरित सात बॅरेजची कामे मंजूर करण्यासाठी मी मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी केले. टाकळगाव (हिंगणी) येथील बॅरेजच्या बांधकामाचे भूमिपूजन करताना त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित, आ‌. सतिश चव्हाण, आ. विक्रम काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सिंदफना नदीवरील टाकळगाव हिंगणी येथील कोल्हापूरी पद्धतीच्या बंधा-याचे रुपांतर करण्याच्या कामाचा भुमीपूजन समारंभ उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार दि. ३१ रोजी संपत झाला.
यावेळीही माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित
आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर चव्हाण, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिक्षक अभियंता पल्लवी जगताप, बीड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पवार, उपअभियंता विशाल हात्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सुमारे १८.१५ कोटी रुपयांच्या बॅरेज बांधकामामुळे या परिसरात १५० हेक्टर शेतजमीन नव्याने ओलिताखाली येणार आहे. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, चेअरमन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाकळगाव येथील महिलांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचा सत्कार केला.

भुमीपुजन प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, या बॅरेजच्या उभारणीमुळे परिसरातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार असून, काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.स्वर्गिय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतील सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नदीवरील टाकळगाव बॅरेजचे काम सध्या सुरू होत असले तरी उर्वरित सात बॅरेजची कामे मंजूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना माजी आमदार अमरसिंह पंडित म्हणाले की, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यामुळे गोदावरी नदी शपात्रात मोठ्या प्रमाणावर बॅरेजची कामे झाली. सिंदफणा नदीकाठ सातत्याने दुष्काळाच्या छायेत असून या भागात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचे प्रश्न गंभीर होत आहेत त्यामुळे सिंदफणा पाणीदार करण्यासाठी उर्वरित सात बॅरेजची कामे मंजूर करण्याची गरज आहे.

या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

error: Content is protected !!