शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) शिरपूर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध विधायक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्ञानपंढरीतील आदर्श करवंद केंद्रांतीलआदर्श जि.प.लौकी शाळेच्या विद्यार्थीप्रिय उपक्रमशील पदोन्नती मुख्याध्यापिका श्रीमती.नंदा रतन पाटील तथा* *सौ.नंदा प्रकाश पवार मॅडम ह्या नुकत्याच* *नियत शासन वयोमानानुसार 34 वर्षे 6 महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर* *सेवानिवृत्त झाल्या.सीटी प्राईड तथा उत्सव हाॅटेल* *याठिकाणी हा सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न झाला.गणेशवंदना व* *ईशस्तवनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सौम्या व ह्रदया यांनी गणेशवंदना व मनोहर धनगर यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.सेवापुर्ती गौरव* *समारंभाचे सूत्रसंचलन, आभार व जीवनपरिचय राजेंद्र पाटील अन प्रास्तविक चंपालाल पाटील यांनी केले.शिरपूर शहराच्या उपनगराध्यक्षा संगिता देवरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले.या कार्यक्रमात जय पवार, शोभा पवार,संगिता पवार,सायली पवार,श्रध्दा पवार,रेखा पाटील,सौम्या* *पाटील यांची सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नंदा पवार मॅडमांच्या शैक्षणिक कार्याचा परिचय करून देणारी भाषणे झाली.या कार्यक्रम प्रसंगी नंदा* *पवार मॅडमांच्या शैक्षणिक कार्याचा परिचय करुन देणारी LED स्क्रीनच्या माध्यमातून चित्रफित दाखविण्यात आली. कार्यक्रमास सुलोचना साळुंखे, रोहित रंधे,शामकांत ईशी, बाळासाहेब बोरसे,हेमंत पाटील,लक्ष्मण पाटील,अशोक कलाल,शरद सुर्यवंशी,अनिल* *बावीस्कर,राजेंद्र भामरे,शोभा पवार,संगिता चौधरी, डाॅ.विनायक पाटील,अविनाश* *पाटील,संदीप पवार,छोटूसिंग राजपूत अधिकारी-* *पदाधिकारीगण,*
*सेवानिवृत्त संघटनेचे* *पदाधिकारीगण,उपस्थित* *होते.सेवानिवृत्त* *मुख्याध्यापिका नंदा पवार मॅडम व त्यांचे पती प्रकाश पवार यांचा लक्ष्मीनारायणासह स्नेहवस्त्र,श्रीफळ,भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन निरोपादाखल सन्मान करण्यात आला.करवंद केंद्रांच्यावतीनेही शिक्षकवृंद यांनी स्नेहवस्त्र,बुके व भेटवस्तू देऊन नंदा पवार मॅडम यांचा सन्मान केला. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नंदा पवार मॅडम यांनी आपल्या 34 वर्षे 6 महिन्यांच्या कालावधीतील शैक्षणिक कार्याचा लेखाजोखा आपल्या मनोगतातून सादर केला.अध्यक्षीय भाषणात उपनगराध्यक्षा संगिता देवरे यांनी नंदा पवार मॅडमांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.आभारप्रदर्शन व* *वंदेमातरम या राष्ट्रीय गीताने सेवापुर्ती गौरव समारंभाचा समारोप करण्यात आला. पवार परिवाराकडून उपस्थित* *मान्यवरांना सुरूचि भोजन *देण्यात आले.कार्यक्रम*
*यशस्वीतेसाठी प्रकाश* *पवार,संजय पवार,जय पवार,संगिता पवार,सायली पवार,श्रध्दा पवार व प्रतिक पवार यांचे ऊस्फुर्त सहकार्य लाभले.*






















