Homeताज्या बातम्यागोंदे फाट्यावरील ढाब्यावर अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश; २.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदे फाट्यावरील ढाब्यावर अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश; २.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त

सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  नाशिक–पुणे महामार्गावरील गोंदे फाटा परिसरातील ढाब्यावर सुरू असलेल्या कथित अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात वावी पोलीस आणि नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत १६.९१२ किलो अफीम डोडा चुरा (पोपी स्ट्रॉ), अंदाजे २ लाख ५१ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना गोंदे फाटा येथील हॉटेल रेणुका माता राजस्थानी ढाबा येथे अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे ६ ऑगस्ट रोजी रात्री ८.२० ते ७ ऑगस्ट रोजी पहाटे ३.४५ वाजेच्या दरम्यान पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत अंकीत वंशपती साकेत (वय २३, रा. गोंदे फाटा, मूळ मध्य प्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून प्लास्टिकच्या गोणीत भरलेला १६.९१२ किलो वजनाचा अफीम डोडा चुरा जप्त करण्यात आला. या प्रकरणातील दुसरा संशयित शोभाराम चौधरी (रा. गोंदे) फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष काशिनाथ गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलीस ठाण्यात NDPS Act, १९८५ मधील कलम ८(क), १५(ब) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वावी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छगन ढोमसे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दूध भेसळीची एसआयटी चौकशी करा मुख्य सूत्रधाराला अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करून संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT)...

८ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

0
पालघर : डहाणू पोलीस ठाणे हद्दीत ८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पालघर येथील अपर जिल्हा व सत्र...

आरोग्य विभागाच्या अहवालाने खळबळ: आजी-माजी आमदार ‘टाळे ठोको’ करणार की प्रकल्पाची पाठराखण?

0
ब्रह्मपुरी  येथील रामदेवबाबा सॉल्व्हंट कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त विषारी पाण्यामुळे संपूर्ण ब्रह्मपुरी परिसरात मोठी आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. प्रकल्पातून निघणारे काळे,...

पोलादपूर तालुक्यात ३ लाख २५ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त तीन आरोपींविरुद्ध गुन्हा;...

0
पोलादपूर रायगड जिल्हा:(प्रतिनिधी दिनेश चाफळकर)  तालुक्यातील कापडे बुद्रुक व परिसरातील विविध ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाड येथील भरारी पथकाने धाड टाकून सुमारे ३...

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या गेवराई तालुकाध्यक्षपदी नानासाहेब पंडित यांची निवड

0
 गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ शाखा गेवराई तालुका ची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीमध्ये तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यात...

error: Content is protected !!