Homeताज्या बातम्यामाहिती अधिकार प्रकरणात PMC बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता झोन 5 कार्यालयाचा भोंगळ...

माहिती अधिकार प्रकरणात PMC बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता झोन 5 कार्यालयाचा भोंगळ कारभार…

माहिती अधिकार प्रकरणात PMC बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता झोन 5 कार्यालयाचा भोंगळ कारभार – माहिती अधिकारातील प्रकरण उघड करते ‘कामकाजाचा ढिसाळपणा’

पुणे, 16 जून 2025 – टाईम्स ऑफ महाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

पुणे महानगरपालिकेच्या (PMC) बांधकाम विभागातील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पत्रकार मुज्जम्मील शेख यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार 28 एप्रिल 2025 रोजी बांधकाम विभागाच्या झोन क्रमांक 1 ते 6 या झोनमध्ये गेल्या वर्षभरात वर्क स्टॉप नोटीसी (काम थांबवण्याचे आदेश) कोणाला दिले गेले व इतर सविस्तर माहिती मागवली होती. मात्र त्यांना माहिती देण्यात आली नाही.

माहितीचा अभाव आणि अपिलाचा देखील अपमान…

शेख यांना वेळेत माहिती मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी नियमाप्रमाणे अपील अर्ज दाखल केले. त्यावर PMC चे झोन 5 या कार्यालयाने सुनावणी ठेवली मात्र सुनावणी संदर्भातील पत्र 6 जून 2025 रोजी लिहिले गेले, मात्र पोस्टात 13 जून दिवशी 11 वाजता टाकले गेले. मात्र संबंधित अर्जदाराला हे पत्र 14 जूनला प्राप्त झाले – जेव्हा सुनावणी संपली होती!

नियोजनशून्य व पत्रव्यवहारातील ढिसाळपणा…

PMC च्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारी ही गंभीर बाब असून, खुद्द कार्यकारी अभियंता, बांधकाम विकास विभाग (झोन 5) यांचे यामध्ये प्रचंड नियोजनशून्य कारभार स्पष्ट दिसतो. जे पत्र 13 तारखेला पाठवले, त्यावर सुनावणीची तारीखही 13 जूनच होती, म्हणजेच “पूर्वलक्ष्यी आदेश” देण्यासारखी ही एकप्रकारची भूमिका आहे का? असा संशय निर्माण होतो.

वर्क स्टॉप नोटीस’चा डेटा अद्याप गुलदस्त्यात…

शेख यांनी विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आजतागायत काहीच अधिकृत प्रतिसाद PMC कडून देण्यात आलेला नाही. पुणे महानगरपालिका दरवर्षी शेकडो वर्क स्टॉप नोटीसी जारी करते. परंतु त्यातील किती नोटीसी पुढे रद्द होतात, न्यायालयात त्या टिकतात की रहदारीतच हरवतात, याबाबतची पारदर्शकता पूर्णतः गायब आहे.

प्रचंड सार्वजनिक हिताचा मुद्दा…

अवैध बांधकामे, त्यांना दिले जाणारे स्टे आदेश, PMC कडून रद्द झालेल्या नोटीसी – या सर्व बाबी शहराच्या विकासावर, शहरी नियोजनावर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर थेट परिणाम करणाऱ्या आहेत. तरीही PMC कडून माहिती लपवण्याचा प्रकार म्हणजे जनतेच्या हक्कांवरच घाला आहे.

यामध्ये बोगस बिल्डरांना पुणे मनपा वाचवण्याचा प्रयत्न तर नाही करत असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे.

PMC ने दिले उत्तर? की टाळली जबाबदारी?

पत्रकार शेख यांच्या पुढील पावलांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात राज्य माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे.

यावर अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता. त्यांनी सांगितले की आम्हाला पाहावं लागेल. नेमकं काय अडचण झाली आहे.

इतर पालिका कार्यालयातही असाच गोंधळ…

यामध्ये पुणे महानगरपालिकेतील इतर कार्यालयात देखील असाच गोंधळ होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे मात्र त्यावेळेस देखील अधिकाऱ्यांकडून असे सांगण्यात आलेले आहे की हे चुकून झालेलं आहे मात्र वारंवार नेमकी चूक पुणे महानगरपालिकडून का होते हा असा भला मोठा प्रश्न उद्भवलेला आहे.

आयुक्तांनी कारवाई करण्याची गरज…

पुणे महानगरपालिकेला काही दिवसांपूर्वीच अत्यंत चांगले व जबाबदार अधिकारी म्हणजेच नवल किशोर राम यांची एक जून रोजी नियुक्ती झालेली आहे. त्यांच्या कामाची पद्धत अनेकांनी पाहिलेली आहे अत्यंत सरळ मार्गे ते काम करतात आणि अधिकारी कर्मचाऱ्यांकडून चूक झाल्यावर त्यांच्या त्यांच्यावर कठोर शिक्षा करत असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे आता या प्रकरणावर आयुक्त नेमकी काय कारवाई करतील हे बघणे महत्त्वाचे ठरले आहे.

भाग 1

क्रमशः

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निफाडमध्ये युवक काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा भारत-अमेरिका व्यापार कराराला विरोध

0
 निफाड(प्रतिनिधी योगेश कर्डिले) : नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे युवक काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढत केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराचा निषेध करण्यात आला. नाशिक जिल्हा...

वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम जळगावात नितीन विसपुते यांचा प्रेरणादायी आदर्श

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगाव शहरात वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आणि समाजाभिमुख आदर्श समोर आला आहे. चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख नितीन विसपुते...

गेवराईत नांदुरकर यांची गट शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती; शिक्षण क्षेत्रात नव्या उमेदीची अपेक्षा

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदुरकर यांची...

लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनची दमदार सुरुवात; क्रीडा क्षेत्रात नवी दिशा देण्याचा निर्धार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  लेवा समाजातील क्रीडा चळवळीला नवे बळ देणाऱ्या लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनच्या भव्य उद्घाटन सोहळ्याने उत्साहाचा उच्चांक गाठला. अत्यंत जल्लोषात पार...

अटलांटा प्रकरणात महापालिकेला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : विमानतळ विकासाशी संबंधित अटलांटा कंपनी प्रकरणात जळगाव महापालिकेला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालय यांनी महापालिकेची याचिका फेटाळून...

error: Content is protected !!