Homeताज्या बातम्याफुरसुंगी नगर परिषदेच्या विरोधात नागरिकांचा जोरदार निषेध मोर्चा...

फुरसुंगी नगर परिषदेच्या विरोधात नागरिकांचा जोरदार निषेध मोर्चा…

फुरसुंगी, पुणे: फुरसुंगी नगर परिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांनी शनिवारी तीव्र स्वरूपाचा निषेध मोर्चा काढला. नगर परिषद स्थापनेला एक वर्षही पूर्ण झाले नसताना नागरिकांमध्ये असंतोषाचा स्फोट झाला असून, मूलभूत गरजांपासून दूर ठेवले जात असल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले.

संकेत विहार व परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेला. मार्च महिन्यात याच प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनाकडून नगर परिषदेचे प्रशासक सचिन पवार यांना नागरिकांशी भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तब्बल तीन महिने उलटून गेले तरीही कोणतीही सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

प्रश्नांची वाढती मालिका

फुरसुंगीतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा, यासारख्या मूलभूत सुविधा आजही नागरिकांना मिळालेल्या नाहीत. “नगर परिषद ही जनतेसाठी काम करणारी संस्था आहे की केवळ नावापुरती यंत्रणा?” असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

प्रशासकांची अनुपस्थिती – निषेधाची ठिणगी

नागरिकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन नगर परिषदेच्या प्रशासकांना दिले होते. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक कार्यालयात येण्याचे टाळल्याचा आरोप करत, निषेध मोर्चा काढण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता, असे संतोष हरपळे यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनामुळे फुरसुंगी नगर परिषदेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन ठोस उपाययोजना न केल्यास, पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!