Homeताज्या बातम्यादावल मलिक बाबा दर्गा रस्त्याची दुर्दशा - भाविकांना जीव धोक्यात घालून...

दावल मलिक बाबा दर्गा रस्त्याची दुर्दशा – भाविकांना जीव धोक्यात घालून करावी लागते यात्रा…

अंतापुर, ता. अंबड, जि. जालना – श्री क्षेत्र दावल मलिक बाबा हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठिकाण असून दर गुरुवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र या पवित्र गडावर जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून भाविकांना जीव मुठीत घेऊन डोंगर चढावा लागतो. या ठिकाणी कुठलाही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे लहान मुलं, महिलावर्ग व वृद्धांना दर्शनासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिक रहिवासी श्री जयेश संजय घुगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन विभाग तसेच वन विभागाकडे तक्रार दाखल केली असून, सदर प्रकरण ग्रामपंचायत अंतापुर व संबंधित वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

भाविकांनी व्यक्त केलेल्या चिंता मुळं एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की, दावल मलिक बाबा हे केवळ श्रद्धास्थान नसून पर्यटनाच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचे केंद्र ठरू शकते. पण रस्त्याअभावी आणि मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे हे ठिकाण दुर्लक्षित राहिले आहे.

श्री घुगे यांनी सांगितले की, “या गडावर दर गुरुवारी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भक्त येतात. मात्र रस्त्याचा अभाव, संरक्षण भिंतीचा अभाव यामुळे अपघाताची शक्यता नेहमीच असते. आपण शासन दरबारी एक हिंदू भाविक व सामाजिक बांधिलकी म्हणून ही मागणी करत आहोत की रस्त्याची पाहणी करून त्वरित उपाययोजना करावी.”

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image above👆👆

तसेच, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग पासून दर्ग्यापर्यंतचा मार्ग, चढाईचा व उतरण्याचा स्वतंत्र व सुरक्षित रस्ता, तसेच संरक्षण भिंती यांची तातडीने उभारणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भाविकांची श्रद्धा आणि सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने त्वरित लक्ष घालून या पवित्र स्थळाचा विकास करावा, अशी कळकळीची मागणी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोणार तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करून निवेदन देण्यात आले

0
बुलढाणा प्रतिनिधी अनिल वायाळ :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवून व पुरेसा साठा उपलब्ध करुन द्या अन्यथा तीव्र आंदोलन...

लासलगावमध्ये शेतीच्या बांधावरून वाद महिलेला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा

0
निफाड (प्रतिनिधी उत्तम जाधव) : शेतीच्या सामायिक बांधावरील लोखंडी अँगल वाकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची...

दौंडमध्ये तंबाखूजन्य पदार्थांविरोधात कारवाई मोठ्या पुरवठादारांवर कारवाईची मागणी जोरात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड) : दौंड शहर आणि तालुक्यात अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा समोर आली...

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

0
बीड (प्रतिनिधी विशेष) : बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार...

चंद्रपूर मनपाच्या २०१४ GIS सर्व्हेवर पुन्हा संशय “साठगाठ घोटाळा”च्या आरोपांनी खळबळ

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेने २०१४ मध्ये राबविलेल्या GIS आधारित मालमत्ता सर्व्हे प्रकल्पावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शहर विकास,...

error: Content is protected !!