Homeताज्या बातम्या‘ओपनगव्ह’चा पुण्यातील नवीन कार्यालयासह जागतिक विस्तार...

‘ओपनगव्ह’चा पुण्यातील नवीन कार्यालयासह जागतिक विस्तार…

पुणे, १५ एप्रिल २०२५ : अमेरिका येथील राज्य आणि स्थानिक सरकारांसाठी ‘एआय’ सक्षम आणि आधुनिक क्लाउड सॉफ्टवेअर पुरवणारी आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘ओपनगव्ह’ने पुण्यासह भारतामध्ये आपल्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. ही घडामोड अधिक प्रभावी आणि जबाबदार सरकार कार्यक्षम बनविण्याच्या ‘ओपनगव्ह’च्या ध्येयाचा महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन कार्यालयाचे उद्घाटन ‘ओपनगव्ह’चे अध्यक्ष आणि सीओओ थियागो सा फ्रेयर ,आर अँड डी’चे चीफ ऑफ स्टाफ टेरेन्स कर्ली आणि एमडी; तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष रमा जयंती यांच्या हस्ते झाले.

‘ओपनगव्हचे पुण्यात कार्यालय स्थापन होणे हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे,’ असे अध्यक्ष आणि सीओओ थियागो सा फ्रेयर यांनी सांगितले. भारताची तंत्रज्ञानातील वाढती क्षमता आणि कुशल मनुष्यबळ यामुळे पुणे हे आमच्या उत्पादनांच्या विकासासाठी आणि विशेषतः एआय क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे, असेही ते म्हणाले. ‘सतत नवनवीन तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच ओपनगव्हने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सरकारी कामकाज अधिक सुलभ करणे, हा या गुंतवणुकीमागील प्रमख उद्देश आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये ओपनगव्हने ‘इग्नेशियस’ नामक ‘लो-कोड’ प्लॅटफॉर्म विकत घेतला. हा प्लॅटफॉर्म सार्वजनिक क्षेत्रातील वर्कफ्लो नियंत्रित करण्याचे काम करतो आणि ग्राहकांच्या गरजेनुसार, ॲप्लिकेशन्स तयार करण्यास मदत करतो. या अधिग्रहणामुळे ओपनगव्हला कार्यक्षमता वाढविणारी एआय-संचालित सोल्युशन्स प्रदान करणे शक्य होणार आहे,’ असेही फ्रेयर यांनी नमूद केले.

‘कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणात नवकल्पना आकार घेत असून, आपल्या काम करण्याच्या पद्धतीपासून ते सरकार आणि नागरिकांमधील संवादापर्यंत सर्व काही बदलत आहे,’ असे ‘ओपनगव्ह’च्या संशोधन व विकास विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ उपाध्यक्षा रमा जयंती यांनी सांगितले. पुण्यातील साई राधे कॉम्प्लेक्स, संगमवाडी येथील हे नवीन कार्यालय नवकल्पना, सहकार्य आणि कौशल्य विकासाचे केंद्र म्हणून कार्य करील. पुण्याचे वाढते माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि कुशल मनुष्यबळ यामुळे हा टप्पा ‘ओपनगव्ह’च्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाचा आहे, असेही रमा जयंती यांनी नमूद केले.

‘ओपनगव्ह’च्या ‘आर अँड डी’चे चीफ ऑफ स्टाफ टेरेन्स कर्ली  म्हणाले, की ‘पुणे इनोव्हेशन सेंटरच्या पुढच्या टप्प्याबद्दल आम्ही खूप उत्साहित आहोत. येथे आम्ही झपाट्याने विस्तार करीत असून, नव्या उत्पादनांवरही भर देत आहोत. हे केंद्र ओपनगव्हच्या वाढीच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावेल.’

‘ओपनगव्ह’ला १२५ वर्षांची परिणामकारक व्यवसाय निर्मितीची परंपरा असलेल्या ‘कॉक्स एंटरप्रायझेस’कडून कायम पाठिंबा आणि पाठबळ मिळाले आहे. ‘कॉक्स एंटरप्रायझेस’च्या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे ‘ओपनगव्’हला उत्पादन विकास आणि नवकल्पनांचा वेग वाढवता आला असून, सरकारी तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. सरकारी तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणून, ‘ओपनगव्ह’ दर्जेदार कर्मचाऱ्यांच्या मदतीने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत नावीन्य आणण्यासाठी कटिबद्ध आहे. ही कंपनी अमेरिकेतील राज्य आणि स्थानिक सरकारांना अधिक प्रभावी आणि सक्षम बनविणाऱ्या उपाययोजना विकसित करण्यासाठी सातत्याने कटिबद्ध आहे.

‘ओपनगव्ह’बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि नव्या संधी मिळविण्यासाठी www.opengov.com/careers/india[1] येथे भेट द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

error: Content is protected !!