Homeताज्या बातम्याDelhi Elections :- दिल्ली पोलीस लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत", सौरभ भारद्वाज...

Delhi Elections :- दिल्ली पोलीस लोकांना मतदान करण्यापासून रोखत आहेत”, सौरभ भारद्वाज यांचा आरोप

Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. तसेच, कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अशातच दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पोलिसांवर आरोप केला आहे.

दिल्ली पोलीस चिराग दिल्लीतील मतदान केंद्रावर लोकांना मतदान करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, “निवडणुकीवर परिणाम करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले आहेत. बॅरिकेड्स का लावले आहेत? दिल्ली पोलिसांच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना बॅरिकेड्स लावण्यास सांगितले आहे? हे सर्व गरिबांना त्रास देण्यासाठी केले जात आहे. जिथे जिथे आपचा बालेकिल्ला आहे, तिथे मालवीय नगरचे एसीपी आणि एसएचओ हे सर्व उघडपणे करत आहेत.”

याचबरोबर, “काल रात्री एसएचओने आमच्या खाजगी जागेवरही छापा टाकला. येथे २१,००० लोकांनी मतदान केले. चिराग दिल्लीतील सर्व १७-१८ मतदान केंद्रांवर पोलीस असे करत आहेत. लोक मतदान करण्यासाठी मेट्रोने किंवा रस्त्याने येऊ शकत नाहीत. वीरेंद्र सचदेवा किंवा राष्ट्रपती मुर्मू या मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर गाडीतून खाली उतरले का? कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत”, असेही सौरभ भारद्वाज म्हणाले.

दरम्यान, सौरभ भारद्वाज यांनी केलेल्या आरोपांना डीसीपी अंकित चौहान यांनी उत्तर दिले आहे. डीसीपी म्हणाले, “वृद्ध आणि ज्यांना चालता येत नाही, त्यांना सूट दिली आहे. त्यांना त्यांच्या गाड्या आत आणण्याची परवानगी आहे. हा नियम सर्वत्र अंमलात आणला जात आहे. ते (सौरभ भारद्वाज) ज्या ठिकाणी सांगत आहेत, त्या ठिकाणांची आम्ही चौकशी करू.”

राजधानी दिल्लीत आज विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होत आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. तर या निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला शनिवारी जाहीर केला जाणार आहे. मतदान किती होते त्यावर निकालाचे गणित अवलंबून आहे. राजधानीत एकूण एक कोटी ५६ लाख मतदार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!