Homeताज्या बातम्याMaharashtra : लाडक्या बहिणींसाठी मंत्री अदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा, 'लवकरच 5000....'

Maharashtra : लाडक्या बहिणींसाठी मंत्री अदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा, ‘लवकरच 5000….’

Maharashtra Pink e Rickshaw : महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला. योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत.

यासोबतच महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केली. याच योजनेचा विस्तार आता होताना दिसत आहे.

महिलांच्या अंगी असणाऱ्या विविध क्षमतांचे संवर्धन करुन त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातील महत्त्वाच्या शहरात ‘पिंक ई रिक्षा’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी पिंक रिक्षा योजना आणली असून राज्यात 10 हजार रिक्षा देण्यात येत आहेत. महानगर क्षेत्रात 500 ते 1 हजार रिक्षा देण्यात येत आहेत. आता याच योजनेच्या अंतर्गत 5000 महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींना स्वस्तात घर खरेदीची संधी; फ्लॅट खरेदीवर सवलत मिळणार, वाचा कशी आणि कुठे

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, “महाराष्ट्रातील माता भगिनींना सन्मान जनक रोजगाराची संधी देणारी “पिंक ई रिक्षा” योजना नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. या योजनेअंतर्गत लवकरच 5000 महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे.”

पिंक ई रिक्षा या योजनेंतर्गत एकूण 5 हजार रिक्षा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये एकल महिला, विधवा, परित्यक्ता यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. राज्यातील मुंबई शहर, नवी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि कल्याण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करण्यात येत आहेत.

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पिंक ई- रिक्षा योजना

पिंक ई- रिक्षा योजनेच्या माध्यमातून महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत असून यात एकल महिला, विधवा, परित्यक्तांना प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रिक्षा किंमतीच्या 20 टक्के रक्कम शासनाकडून देण्यात येते तर 10 टक्के रक्कम महिलांनी भरावयाची असून उर्वरित 70 टक्के रक्कम बॅंक कर्जाच्या माध्यमातून भरावी लागणार आहे. या योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!