Homeताज्या बातम्याManoj Jarange : अंतरवालीतील उपोषण थांबवण्याची मनोज जरांगेंची घोषणा, यापुढे उपोषण कायमचे...

Manoj Jarange : अंतरवालीतील उपोषण थांबवण्याची मनोज जरांगेंची घोषणा, यापुढे उपोषण कायमचे बंद, कारणही सांगीतले

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आपले उपोषण थांबवण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणी अडथळा आणला याचा खुलासा आता झाला असून, मराठा समाजाचे डोळे उघडल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

तसेच, यापुढे शक्यतो उपोषणाच्या माध्यमातून लढाई न लढण्याचा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील दिशा ठरवण्यासाठी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

पाच दिवसांपासून सुरू असलेले उपोषण थांबणार

मनोज जरांगे हे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करत होते. मात्र, या कालावधीत त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला, तरी शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. “मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी एवढा संघर्ष करावा लागेल, असे वाटले नव्हते,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर लक्ष राहावे म्हणून निर्णय

मस्साजोग येथील दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मंगळवारी रात्री मनोज जरांगेंची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण तापलेले असताना, जरांगेंचे उपोषणही सुरू होते. त्यामुळे या प्रकरणावरून लक्ष हटू नये, म्हणून आपण उपोषण मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांवर टीका, सरकारला इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, “खरे असेल ते टिकत नाही आणि जे हक्काचे आहे तेच दिले जात नाही. फडणवीस मराठा आरक्षणाबाबत ‘होय’ किंवा ‘नाही’ असे स्पष्ट उत्तर देत नाहीत. त्यांची मराठा समाजाबद्दलची मनोवृत्ती आता उघड झाली आहे.”

तसेच, “आमच्याशी बेइमानी केल्यास पुढची पाच वर्षे सरकार नीट चालू देणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका घ्यावी, असा अल्टिमेटमही त्यांनी दिला होता. मात्र, परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!