Homeताज्या बातम्याहायवे असो, विमानतळ असो की रेल्वे..; पायाभूत सुविधांवर सरकारचे विशेष लक्ष, पाहा...

हायवे असो, विमानतळ असो की रेल्वे..; पायाभूत सुविधांवर सरकारचे विशेष लक्ष, पाहा आकडे

दिल्ली : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार आल्यापासून देशभरातील पायाभूत सुविधांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. यातच आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एक महत्वाची माहिती दिली.

लोकसभेत बोलताना ते म्हणाले की, मोदी सरकार लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्चात सातत्याने वाढ करत आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 11.11 लाख कोटी रुपयांचे भांडवली खर्चाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.

पंकज चौधरी पुढे म्हणाले की, सरकारचा भांडवली खर्च 2021-22 मधील 5 लाख कोटी रुपयांवरून 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 11.11 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. मोदी सरकारचे लक्ष चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आहे. गेल्या 10 वर्षांत देशातील रस्ते, विमानतळ आणि रेल्वे क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाली आहे. यामुळे लोकांचे जीवन अधिक सोपे आणि सोयीस्कर झाले आहे.

राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 1.6 पटीने वाढले

राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 1.6 पटीने वाढले आहे. 2014 मध्ये 91,287 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते, जे नोव्हेंबर 2024 पर्यंत 1,46,195 किमी पर्यंत वाढले आहेत. भारतमाला प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात 34,800 किमी राष्ट्रीय महामार्ग बांधले जाणार आहेत. त्यापैकी 26,425 किलोमीटरचे काम देण्यात आले आहे, तर 18714 किमी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. देशातील कार्यरत विमानतळांची संख्या दुपटीने वाढली आहे. 2014 मध्ये 74 विमानतळांवरून उड्डाणे सुरू होती, तर 2024 मध्ये देशातील 158 विमानतळांवरून विमानसेवा सुरू होणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

97 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण 

रेल्वेबाबत पंकज चौधरी म्हणाले, 97 टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले आहे. रस्ते, रेल्वे आणि हवाई नेटवर्कच्या बळकटीकरणामुळे देशातील आर्थिक विकासाचा वेग तर वाढला आहेच, पण स्थानिक पातळीवर मूलभूत सुविधांमध्येही सुधारणा झाली आहे आणि त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निफाडमध्ये युवक काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा भारत-अमेरिका व्यापार कराराला विरोध

0
 निफाड(प्रतिनिधी योगेश कर्डिले) : नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे युवक काँग्रेसच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढत केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार कराराचा निषेध करण्यात आला. नाशिक जिल्हा...

वाढदिवसानिमित्त सेवाभावी उपक्रम जळगावात नितीन विसपुते यांचा प्रेरणादायी आदर्श

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : जळगाव शहरात वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आणि समाजाभिमुख आदर्श समोर आला आहे. चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख नितीन विसपुते...

गेवराईत नांदुरकर यांची गट शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती; शिक्षण क्षेत्रात नव्या उमेदीची अपेक्षा

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदुरकर यांची...

लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनची दमदार सुरुवात; क्रीडा क्षेत्रात नवी दिशा देण्याचा निर्धार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  लेवा समाजातील क्रीडा चळवळीला नवे बळ देणाऱ्या लेवा स्पोर्ट्स क्लब फेडरेशनच्या भव्य उद्घाटन सोहळ्याने उत्साहाचा उच्चांक गाठला. अत्यंत जल्लोषात पार...

अटलांटा प्रकरणात महापालिकेला मोठा धक्का; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : विमानतळ विकासाशी संबंधित अटलांटा कंपनी प्रकरणात जळगाव महापालिकेला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालय यांनी महापालिकेची याचिका फेटाळून...

error: Content is protected !!