Homeताज्या बातम्या‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा सोमवारी ७वा दिक्षांत समारंभ...

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा सोमवारी ७वा दिक्षांत समारंभ…

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत २९७२ विद्यार्थ्यांना बहाल होणार पदवी…

पुणे :- एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या ७व्या दिक्षांत समारंभाचे सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३.०० वा. आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मा.श्री.सी.पी.राधाकृष्णन (राज्यपाल, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रमुख उपस्थितीत तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली लोणी काळभोर येथे पार पडणार आहे. यंदा विद्यापीठातील २९७२ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात येणार आहे.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून राष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान विद्यापीठ, गांधीनगर, गुजरातचे कुलगुरू, पद्मश्री डॉ.जयंतकुमार एम.व्यास यांना विज्ञान व तंत्रज्ञानामधील योगदानाबद्दल भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठाने सन २०१५ मध्ये स्थापना झाल्यापासून केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. यंदाच्या दिक्षांत समारंभात, २२ विद्यार्थ्यांना पीएचडी, ५३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर १९४ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांसह जवळपास ८ हजारपेक्षा अधिक लोक देशभरातून उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाने परीक्षेसाठी संपूर्ण डिजीटल प्रणाली अवलंबली असून, त्यामुळे परिक्षेची अंमलबजावणी निर्विघ्न होते. यासह वेळेत अचून निकाल व सर्व प्रक्रियेतील पारदर्शकता ही ‘एमआयटी एडीटी’ची आता ओळख बनली आहे.
विद्यापीठाच्या आजपर्यंत झालेल्या ६ दिक्षांत समारंभात नितीनजी गडकरी, विनोदजी तावडे, इस्त्रोचे माजी चेअरमन पद्मविभूषण डॉ. जी. माधवन नायर, राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डीआरडीओचे माजी चेअरमन डॉ.जी.सतीश रेड्डी, इस्त्रोचे विद्यमान चेअरमन डॉ.एस. सोमनाथ यांनी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे यंदा आम्ही राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे विद्यापीठात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत, अशी माहिती विद्यापीठाचे, प्र.कुलगुरू प्रा.डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ.महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डॉ.ज्ञानदेव नीलवर्ण, मानवविज्ञान शाखेच्या अधिष्ठाता प्रिया सिंग यांनी यावेळी दिली आहे.
“यंदाच्या दिक्षांत समारंभात २२ पीएचडी, ५३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांसह एकूण २९७२ विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटी विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यपाल मा.श्री. सी.पी.राधाकृष्णन व पद्मश्री. पद्मश्री डॉ.जयंतकुमार एम.व्यास विद्यापीठात प्रथमच येत असल्याने, त्यांचे स्वागतासाठी विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. ”
– प्रा.डॉ. मंगेश कराड,  कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आरोग्य आणि संस्कृती हेच समाजरचनेचे दोन आधारस्तंभ – आ.डॉ.गुट्टे

0
परभणी (जिल्हा प्रतिनिधी अनिल शेटे) : मानवी जीवन समृद्ध, सुसंस्कृत आणि आनंदी बनविण्यासाठी आरोग्य आणि संस्कृती या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. निरोगी...

उल्हासनगर सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड; ऑपरेशनसाठी चार वेळा उपाशी ठेवूनही शस्त्रक्रिया लांबणीवर

0
ठाणे : उल्हासनगर येथील शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातील कथित गलथान कारभारामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजकुमार पासी या रुग्णाला शस्त्रक्रियेच्या...

सिरोंचा पोलीस उपविभागाकडून गरजू युवतीस विवाहासाठी आर्थिक मदत

0
गडचिरोली (प्रतिनिधि जाबिर खान): गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत श्री.एम. रमेश पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री.कार्तिक मधिरा मा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान)तसेच श्री गोकुल राजजी अपर पोलीस...

नागपुरातपहिल्यांदाचउलगडणार ‘क्रांतिज्योतीसावित्रीबाईफुले’ यांच्याजीवनावरीलमहानाट्य!

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): स्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आता रंगमंचावर जिवंत...

ईद-उल-अजहा निमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक

0
(तालुका प्रतिनिधी जाबिर खान): दि. 26 मे 2026 रोजी सिरोंचा पोलीस स्टेशन येथे SDPO संदेश नाईक आणि M.K. नांदे यांच्या उपस्थितीत ईद-उल-अजहा (बकरी...

error: Content is protected !!