Homeताज्या बातम्यादौंडपोलिसांचीमोठीकारवाई अपघाताचाबनावकरून 6.68 लाखांचेखोबरेलंपासकरणारीटोळीजेरबंद

दौंडपोलिसांचीमोठीकारवाई अपघाताचाबनावकरून 6.68 लाखांचेखोबरेलंपासकरणारीटोळीजेरबंद

दौंड (प्रतिनिधी मयुर साळवे, संघराज गायकवाड )

दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने अपघाताचा बनाव करून टेम्पोमधील लाखो रुपयांचे खोबरे अपहार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 6,68,775 रुपये किमतीचे 3615 किलो खोबरे जप्त करण्यात यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत मारुल सिद्धाप्पा, रा. चिंकमंगळूर (कर्नाटक) यांनी त्यांचा आयशर टेम्पो क्र. MH 47 AS 5368 मधून खोबरे पुण्यातील गुलटेकडी येथे विक्रीसाठी पाठविले होते. वाहन चालक मनोज आंध्रेश बनसोडे याच्या ताब्यात हा माल देण्यात आला होता.

दि. 19 मे 2026 रोजी सकाळी चालकाने कुरकुंभ परिसरात टेम्पोचा अपघात होऊन वाहन पलटी झाल्याचे तसेच अज्ञात व्यक्तींनी खोबरे चोरी करून नेल्याचे फिर्यादीस सांगितले. मात्र घटनास्थळी पाहणीदरम्यान दौंड पोलिसांना प्रकार संशयास्पद वाटल्याने अधिक तपास करण्यात आला.

पोलीस चौकशीत चालक मनोज बनसोडे याने त्याचे साथीदार सुनील दत्तात्रेय लावरे, अनिकेत रावसाहेब पवार व तुषार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीने खोबरे दुसऱ्या वाहनात भरून अपहार केल्याची कबुली दिली. चोरी लपवण्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचेही निष्पन्न झाले.

याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 329/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 316(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपींना ताब्यात घेत अटक केली असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, बिद्री तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!