Homeताज्या बातम्याफडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली...

फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली…

फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नंतर पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली.

याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीपासून कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने आरोपीवर ३०४ हे कलम लावले होते, अशी माहितीही फडणवीसांनी दिली होती. मात्र फडणवीसांचा हा दावा पुणेकरांची दिशाभूल करणारा असून पोलिसांनी सुरुवातीला ३०४ अ हे कलम लावलं असल्याचा दावा करत काँग्रेस आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.

रवींद्र धंगेकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, “काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये कलम ३०४ चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पीआय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती,” अशा शब्दांत धंगेकर यांनी पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?

पोलिसांच्या भूमिकेचा बचाव करताना काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, ” पोलिसांनी एफआयआर दाखल किती वाजता केला, त्याचं टायमिंग आहे. एफआयरमध्ये सुरुवातीलाच पोलिसांनी कलम ३०४ लावले आहे, ३०४ अ लावला असता तर आरोपीला सुटण्याचे सर्व पर्याय होते. मात्र पोलिसांनी तसं न करता आरोपीने केलेलं कृत्य गंभीर असल्याने त्याला अडल्ट गृहित धरून ३०४ कलम लावले. त्यामुळे याच्यावर राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं आहे. पण बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा धक्कादायक आहे आणि आम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे, हे मी उघडपणे सांगतो,” अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे आमदार गोकुळ गीते यांचा सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव...

शेतात पाइपलाईन करायची आहे, मग पाईपासाठी शासन देतंय 100 टक्के अनुदान

0
गडचिरोली: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. योजनेंतर्गत...

वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कठोरा बुद्रुक शिवारातील घटना; परिसरात हळहळ

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रुक शिवारात शेतात पेरणीचे काम सुरू असताना अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

वडसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची रोपे समितीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वडसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजनासाठी आणलेली वडाची रोपे जतन करणे शक्य नसल्यास ती ढगा डोंगर संवर्धन समितीकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन समितीने...

error: Content is protected !!