Homeताज्या बातम्यारवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल...

रवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल…

पुणे : पुणे लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. याच मतदानाच्या दरम्यान भाजप आणि क़ॉंग्रेसकडून आंदोलनं करण्यात आली. त्यात दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

त्यानंतर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. आता त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवरदेखील आता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

रवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप यांच्यासह २० ते २५ महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहिता असतानाही बेकायदेशीर जमाव जमून घोषणाबाजी करुन उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. 

धंगेकरांवरही गुन्हा दाखल

पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव गोळा केल्या प्रकरणी धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. भाजपावरती पैसे वाटप केल्याचा आरोप करत धंगेकर यांनी मतदानाच्या आदल्या दिशवी ठिया आंदोलन केलेलं होतं. ते आंदोलन करणं धंगेकरांना चांगलंच महागात पडलं आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात धंगेकरांसह 35 ते 40 कार्यकर्त्यांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटप करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची नावे सांगूनही त्यांच्यावर कसलीही कारवाई पोलीस करत नसल्याने सहकारनगर पोलीस ठाण्यातच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रविवारी ठिय्या आंदोलन केलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी व फार्मर कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिन्नर यांच्या वतीने आयोजित क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व फार्मर कप स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. २९)...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना जाहिर आवाहन SIR-2026 चा कार्यक्रम घोषित !

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ​मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र मुंबई यांचे आदेशानुसार ०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघात SIR-२०२६...

अनंत अंबानींकडून तिरुमला देवस्थानाला २५ इलेक्ट्रिक बसांचे दान; ई-वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना

0
तिरुमला : अनंत अंबानी यांनी तिरुमला वेंकटेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला तब्बल २५ इलेक्ट्रिक बसांचे दान जाहीर केले. सुमारे...

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे आमदार गोकुळ गीते यांचा सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव...

error: Content is protected !!