Homeताज्या बातम्याअल्पवयीन मुलीवर अत्याचार मुलीची काय चूक होती ?पुण्यात अतिशय संतापजनक प्रकार.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुलीची काय चूक होती ?पुण्यात अतिशय संतापजनक प्रकार.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार मुलीची काय चूक होती ?पुण्यात अतिशय संतापजनक प्रकार…

पुणे : पुण्यात एक मुलीवर अत्याचार तसेच तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला. संबंधित प्रकार अतिशय संतापजनक आणि किळसवाणा आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या आजारपणासाठी घेतेलेले अवघ्या 30 हजार रुपयांसाठी आरोपींनी हे कृत्य केलं आहे.

संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर संपूर्ण शहरातून संताप व्यक्त केला जातोय. या घटनेत पीडितेचा काय दोष होता? तिच्यासोबत इतकं निर्घृण कृत्य करणाऱ्या आरोपींना तिची जरासुद्धा दया आली नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हे पती-पत्नी आहेत. त्यामुळे आरोपी महिलेला पीडितेबाबत कोणतीही सहानुभूती वाटली नसावी? आरोपी महिला इतकी निर्दयी असावी? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातून एक धक्कादायक आणि अतिशय संतापजनक अशी घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला 15 दिवस डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे न दिल्याने आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पीडितेला 15 दिवस लाँजमध्ये डांबून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला. पुण्यातील 3 लाँजमध्ये जाऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. हा सगळा प्रकार मागील ऑक्टोबरपासून सुरू होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पूनम माने (वय 22) आणि आकाश माने (वय 24) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. तसेच पूनम माने हिला पोलिसांनी अटक केलीय. तर तिचा नवरा आकाश हा फरार आहे.

पोलिसांना घटनेची माहिती कशी मिळाली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील आजारी असताना त्यांनी फिर्यादी दाम्पत्ययाकडून उपचारासाठी 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र काही कारणामुळे फिर्यादी यांना ते पैसे परत देता येत नसल्याने आरोपींनी तिला एका लॉज वर नेऊन तिला १५ दिवस डांबून ठेवलं. या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने वारंवार बलात्कार केला. यावरच न थांबता या दांपत्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने शरीर विक्रीस भाग पाडले आणि तिला वेशव्याव्यसाय करून आरोपींनी पैसे कमावले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे महानगरपालिकेत ४१ कोटींचा ‘झाडू’ घोटाळा; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, खोट्या सर्वेक्षणातून जुन्याच ठेकेदारांवर...

0
घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; 'एका ठेकेदाराला दोनच कामे' हा नियम धाब्यावर, ६९०५ किलोमीटरच्या फुगवलेल्या...

नेत्यांच्या सावलीत नगरसेवक! जनतेची कामे बाजूला, राजकीय वादातच वेळ वाया.

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘टिकीट संस्कृती’चा शिरकाव; विकासकामांऐवजी राजकीय वादांमध्ये रममाण होणाऱ्या प्रतिनिधींवर नागरिकांचा रोष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

अतिक्रमण, खड्डे, पाण्याचे डबके; गणेशोत्सवापूर्वी शहर स्वच्छतेवर महासभेत चर्चा

0
जळगाव :(प्रतिनिधी विनोद पवार)जळगाव शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या महासभेत अतिक्रमण हटविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे,...

निफाड नगरपंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद : प्रथमच बौद्ध समाजातील महिला अरुंधतीताई पवार नगराध्यक्षपदी विराजमान

0
निफाड:( प्रतिनिधी योगोश कर्डीले)  निफाड तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षराने नोंद होणारी घटना घडली. निफाड नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच एससी वर्गातून बौद्ध समाजातील महिला लोकप्रतिनिधी...

सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची मागणी; पोलीस महासंचालकांकडे निवेदन

0
रायगड:(प्रतिनिधी दिनेश चाफळकर) महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार १५ दिवसांच्या अर्जित रजेचे (Earned Leave) रोखीकरण लागू करून १ जानेवारी २०१६...

error: Content is protected !!