Homeताज्या बातम्यामुलांनी आणि त्यांच्या पालकांनी पुस्तके वाचून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केल...

मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी पुस्तके वाचून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केल आपला नाव

मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी पुस्तके वाचून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केल आपला नाव…

पुणे : पुणे शहरात केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने डिसेंबर महिन्यात पुणे बुक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी पुस्तक वाचन केल्याने त्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली.

या कार्यक्रमामुळे आयोजकांचे विविध स्तरातून कौतुक करण्यात आले. मात्र, आता या कार्यक्रमाच्या आयोजनात पुणे महापालिकेचा सहभाग असल्याने यासाठी 30 लाख रुपये पालिकेला द्यावे लागणार आहेत.

लहान मुले, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने पुण्यात १६ ते २४ डिसेंबर या कालावधी पुणे बुक फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा, यासाठी महापालिकेला याचे सहप्रायोजक देखील करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार एस. पी. कॉलेजच्या मैदानावर ‘ स्टोरी टेलिंग गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांचे पालक सहभागी झाले होते.

पुणे बुक फेस्टिव्हलचे समन्वयक म्हणून जबाबदारी असलेले राजेश पांडे हे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या संयोजनात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग होता. राज्य तसेच केंद्रातील काही व्यक्ती देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या. त्यामुळे कार्यक्रमाला राजकीय रंग असल्याची चर्चा सुरू होती. हा कार्यक्रम भाजपने आयोजित केल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात होती. त्यातच आता या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 30 लाख 37 हजार रुपये पालिकेला द्यावे लागणार आहेत. त्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला आहे.

हा कार्यक्रम अचानकपणे आयत्या वेळेस पालिकेला कळवण्यात आला होता त्यासाठी पालिकेने सहप्रयोजक व्हावे, असे सूचनाही राज्यस्तरावरून महापालिकेला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कार्यक्रमासाठी पालिकेच्या बजेटमध्ये तरतूद उपलब्ध नव्हती. परिणामी ही रक्कम वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मार्केट यार्ड पोलिसांची कामगिरी; चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी शोधून मालकिणीला परत

0

पुणे, प्रतिनिधी : मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेली अॅक्टिव्हा दुचाकी अवघ्या तपासाच्या जोरावर शोधून काढण्यात मार्केट यार्ड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 139/26 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पल्लवी विठ्ठल दिघे (वय 36), रा. दिघी टॉवर, जाधव […]

पुणे महानगरपालिकेत ४१ कोटींचा ‘झाडू’ घोटाळा; आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, खोट्या सर्वेक्षणातून जुन्याच ठेकेदारांवर...

0
घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे आणि अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह; 'एका ठेकेदाराला दोनच कामे' हा नियम धाब्यावर, ६९०५ किलोमीटरच्या फुगवलेल्या...

नेत्यांच्या सावलीत नगरसेवक! जनतेची कामे बाजूला, राजकीय वादातच वेळ वाया.

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘टिकीट संस्कृती’चा शिरकाव; विकासकामांऐवजी राजकीय वादांमध्ये रममाण होणाऱ्या प्रतिनिधींवर नागरिकांचा रोष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

अतिक्रमण, खड्डे, पाण्याचे डबके; गणेशोत्सवापूर्वी शहर स्वच्छतेवर महासभेत चर्चा

0
जळगाव :(प्रतिनिधी विनोद पवार)जळगाव शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या महासभेत अतिक्रमण हटविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे,...

निफाड नगरपंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद : प्रथमच बौद्ध समाजातील महिला अरुंधतीताई पवार नगराध्यक्षपदी विराजमान

0
निफाड:( प्रतिनिधी योगोश कर्डीले)  निफाड तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षराने नोंद होणारी घटना घडली. निफाड नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच एससी वर्गातून बौद्ध समाजातील महिला लोकप्रतिनिधी...

error: Content is protected !!