Homeताज्या बातम्याखिशातून पैसे काढणाऱ्याचा आला राग ; रागात तरुणाचा खून ; खराडी गावातील...

खिशातून पैसे काढणाऱ्याचा आला राग ; रागात तरुणाचा खून ; खराडी गावातील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक…

पुणे :- खिशातून ५०० रुपये काढल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण करुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

ही घटना ८ नोव्हेंबर रात्री एक ते ९ नोव्हेंबर सकाळी साडेनऊच्या दरम्यान खराडी येथील म्हसोबा मंदिराजवळ घडली आहे.

किरण अशोक साठे (वय-२४ रा. खराडी, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी लोकेश रविंद्र पाटील (वय-२२ रा. पाटील वस्ती, केसनंद, पुणे) याच्यावर आयपीसी ३०२ नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष मच्छिंद्र घोडके यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ससून हॉस्पिटलमधील शवविच्छेदन अहवालात खून असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करुन अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी पोलीस रेकॉर्डवरील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किरण साठे याने आरोपी लोकेश पाटील याच्या खिशातून गुपचूप ५०० रुपयेकाढून घेतले. याच कारणावरुन आरोपी लोकेश याने लाकडी बांबूने किरणच्या डोक्यात, हातावर व नाकावर मारहाण केली.यामध्ये गंभीर जखमी होऊन किरणचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळीधाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून किरण साठेयाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

error: Content is protected !!