Homeताज्या बातम्यापुणे मेट्रोकडून १२ जागांवर सुरु होणार वाहनतळ ; मार्च मध्ये सुरू होणार...

पुणे मेट्रोकडून १२ जागांवर सुरु होणार वाहनतळ ; मार्च मध्ये सुरू होणार स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मार्ग…

पुणे मेट्रोकडून १२ जागांवर सुरु होणार वाहनतळ ; मार्च मध्ये सुरू होणार स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मार्ग…

पुणे : महामेट्रोकडून शहरातील १२ जागांचा वाहनतळ म्हणून विकास करणार आहे. याशिवाय मेट्रोच्या प्रत्येक स्थानकाकडे येणे व तिथून जाणे प्रवाशांना सोपे व्हावे यासाठी ई-रिक्षा, शेअर रिक्षांसारखे उपायही सुरू करण्यात येत असून, गर्दीच्या स्थानकांचा अभ्यास करण्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात आली आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी ही माहिती दिली. वाहनतळाच्या जागांवर प्रवाशांना नेणाऱ्या आणणाऱ्या रिक्षांसाठीही जागा असेल. तसेच बससारखी मोठी वाहनेही तिथून प्रवाशांची ने-आण करतील, असे हर्डीकर यांनी सांगितले. या जागा लहान आहेत. या जागा लहान आहेत, त्यामुळे तिथे फार मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांसाठी वाहनतळ सुरू करता येणे शक्य नाही. त्यामुळेच रिक्षा, बस आदी वाहनांसाठीचा हा तळ असेल, असे हर्डीकर यांनी सांगितले.

संचालक हेमंत सोनवणे, सनेर पाटील हेही यावेळी उपस्थित होते. हर्डीकर यांनी २८ जुलै २०२३ रोजी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर प्रथमच त्यांनी पत्रकार परिषद घेत मेट्रोच्या कामांचा आढावा घेतला. मेट्रोशी संबंधित सर्व गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलण्याचे ठरविल्यामुळे विलंब झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

मेट्रोची कोणाबरोबरही स्पर्धा नाही. शहरांतर्गत प्रवासी वाहतूक सुलभ करणे, सुरक्षित करणे, किफायतशीर करणे हे मेट्रोचा खरा उद्देश आहे. पीएमएपीएल, रिक्षा अशा अन्य सार्वजनिक प्रवासी वाहतूकीच्या पर्यांयांबरोबर हातमिळवणी केली तरच हे शक्य आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर पीएमपीएलचे प्रवासी कमी झालेले नाहीत, तर वाढले आहेत, असा दावा हर्डीकर यांनी केला. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा मेट्रोचा मार्ग मार्च २०२४ मध्ये व सध्या रुबी हॉलपर्यंतच असलेली मेट्रो रामवाडीपर्यंत डिसेंबरमध्ये सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

स्वारगेट ते कात्रज हा भुयारी मार्ग आता केंद्रीय स्तरावर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून, तो सध्या सुरू असलेल्या मार्गाचाच विस्तारित भाग समजण्यात आला आहे. रामवाडीपासून पुढे वाघोलीपर्यंत, पिंपरीपासून पुढे निगडीपर्यंत, वनाजपासून पुढे चांदणी चौकापर्यंत हे विस्तारित मार्गही मंजुरीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. त्याशिवाय स्वारगेट ते खडकवासला, नळस्टॉप ते माणिकबाग, हडपसर ते स्वारगेट अशा मार्गांचा प्रकल्प अहवाल तयार होत आहे. मेट्रोचे जाळे वाढल्याशिवाय मेट्रोचा खरा उपयोग दिसणार नाही, असे हर्डीकर म्हणाले.

वाहनतळ म्हणून विकास होणाऱ्या जागा

पीसीएमसी

संत तुकारामनगर

फुगेवाडी

शिवाजीनगर

सिव्हिल कोर्ट

स्वारगेट

आयडियल कॉलनी

गरवारे महाविद्यालय

मंगळवार पेठ

वनाज डेपो

रेंजहिल कॉर्नर

नळस्टॉप

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झिंगानूर–सिरोंचा मुख्य रस्ता बुधवारपासून बंद; नैगुंडा नाल्यावरील रापटा पुरात वाहून गेला

0
प्रतिनिधी : (जाबिर खान) सिरोंचा झिंगानूर–सिरोंचा मुख्य मार्गावरील नैगुंडा नाल्यावरील रापटा सलग चार ते पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णपणे उध्वस्त झाल्याने बुधवारपासून या...

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

error: Content is protected !!