Homeताज्या बातम्याशरद पवारांच्या जवळचा नेता अजित पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता ?...

शरद पवारांच्या जवळचा नेता अजित पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता ? पुन्हा मोठा राजकीय धमाका होणार ?

शरद पवारांच्या जवळचा नेता अजित पवार यांच्या गटात सामील होण्याची शक्यता ? पुन्हा मोठा राजकीय धमाका होणार ?

टाईम्स ऑफ महाराष्ट्र (ब्युरो) : राष्ट्रवादीचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. अशातच खुद्द जयंत पाटीलच वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे.

त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी नेमकी कुणाची, यावरून काका-पुतण्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात त्याबाबतची सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टातही आमदार अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यात आता एकमेकांचे आमदार फोडण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार गटाकडून शक्तिप्रदर्शन केलं जात आहे. अजित पवार गटाचे 15 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला होता. त्यामुळे अजित पवार गटाला खिंडार पडण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

जयंत पाटलांच्या या दाव्याचा धुरळा खाली बसत नाही तोच अजित पवार गटाचे अन्न आणि औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी खळबळ उडवून दिली. जयंत पाटील हेच आमच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट आत्राम यांनी केला. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही आत्राम यांच्या दाव्याला पुष्टी दिली आहे.

सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही – अजित पवारांचा दावा…

आमदार अपात्रतेप्रकरणी 30 ऑक्टोबरला होणा-या सुप्रीम कोर्टातील सुनावणीचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही असा दावा अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. विधानसभा अध्यक्षांना केवळ शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक सादर करायला सांगितलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रकरणावर अजून कोणतीही सुनावणी होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

दिल्लीतल्या नव्या राष्ट्रीय कार्यालयात शरद पवारांचा फोटो नाही

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दिल्लीतल्या नव्या राष्ट्रीय कार्यालयात शरद पवारांचा फोटो लावण्यात आलेला नाही. तर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो लावण्यात आलेत. दिल्लीतल्या 79 नॉर्थ एव्हेन्यूवर नवं कार्यालय सुरू करण्यात आलंय. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर कॅनिंग लेन मधलं कार्यालय काढून घेण्यात आलं होतं. त्यानंतर अजित पवारांना हे नवं कार्यालय देण्यात आलं.

#timesofmaharashtranews #timesofmaharashtra #timesofmaharashtramas

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!