Homeताज्या बातम्याअबबबब....तब्बल 24 कोटी 90 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क एकाच नोंदणीत बुडावल्याचा ठपका...

अबबबब….तब्बल 24 कोटी 90 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क एकाच नोंदणीत बुडावल्याचा ठपका ठेवत सह दुय्यम निबंधक भातंबरेकर यांचे निलंबन ; एकाच प्रकरणात एवढा मोठा घोळ तर, त्यांच्या बाकीच्या कार्यकाळात किती ; कोण कोण आहेत यामध्ये सामील ?

पुणे : पुण्यातील आकुर्डी येथे असेलेले दुय्यम निबंधक कार्यालयाचे हवेली क्रमांक २४ सह दुय्यम निबंधक एस.पी. भातंबरेकर यांचे निलंबन करण्यात आले आहे. खरेदीखताच्या दस्तात तब्बल २४ कोटी ९० लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क कमी आकारल्याचा ठपका ठेवत भातंबरेकर यांचे निलंबन करण्यात आले आहे.

याबाबतचे आदेश राज्य शासनाचे अवर सचिव प्रितमकुमार जावळे यांनी काढले आहे. या कार्यालयाला गुरुवारी (१२ ऑक्टोबर) शहरचे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी अचानक भेट दिली. तसेच हिंगाणे यांच्या कार्यालयातील तपासणी पथकाकडून हवेली क्र. २४ या कार्यालयात चालू वर्षातील १ सप्टेंबर आणि ११ ऑक्टोबरपर्यंत नोंदविण्यात आलेल्या दस्तांची स्वैरपद्धतीने (रॅण्डम) तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीत भातंबरेकर यांनी ११ सप्टेंबर रोजी नोंदविलेल्या एका खरेदीखताच्या दस्तात २४ कोटी ९० लाख १५ हजार ८०० रुपयांच्या मुद्रांक शुल्काची कमी आकारणी केली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. याबाबत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे यांनी ही बाब १७ ऑक्टोबरला राज्य शासनाला कळविली.
त्यानुसार भातंबरेकर यांनी खरेदीखताच्या दस्तात योग्य मुद्रांक शुल्क न आकारल्याने शासनाचा महसूल बुडाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भातंबरेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. १९ ऑक्टोबरपासून पुढील आदेश प्रसृत करेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश अंमलात असेपर्यंत भातंबरेकर यांचे मुख्यालय मुद्रांक जिल्हाधिकारी राहणार आहे. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांनी मुख्यालय सोडू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हे झाल्यानंतर आता हा विचार पडला आहे की त्यांच्या कार्यकाळात त्यांनी किती महसूल बुडवला असेल. आणि किती मलिदा त्यांना भेटला असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोण कोण आहेत यामध्ये सामील ?
नोंदणी व मुद्रांक विभागात खरेदीखत करण्यासाठी दुय्यम निबंधकांनी व इतर अधिकाऱ्यांनी एजंट ठेवले असल्याचे पुणे जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. हे एजंट अर्जंट नंबर मिळून देतो, तुमची दस्त नोंदणी शुल्क कमी करून देतो असे कारणे सांगून नागरिकांकडून अनेक रुपयांची लूट करत असल्याचे देखील सूत्रांकडून कळाले आहे. तसेच यांच्या समवेत यांना पाठीशी घालण्याकरिता वरिष्ठ अधिकारी देखील यांना सहकार्य करत असल्याचे माहिती मिळाली आहे.
यावर सध्या असा प्रश्न उपस्थित झाला आहे की, या अधिकाऱ्यांवरती तर कारवाईची सुरुवात झालीये म्हणा, परंतु अधिकाऱ्यांनी ठेवलेल्या एजंट वरती कारवाई कधी होणार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. 
 
#timesofmaharashtranews #timesofmaharashtra #timesofmaharashtramas
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!