Homeताज्या बातम्याविमानतळ पोलीस ठाण्याची उत्तम कामगिरी ; विमानाने पुण्यामध्ये येवुन महागडे फोन चोरी...

विमानतळ पोलीस ठाण्याची उत्तम कामगिरी ; विमानाने पुण्यामध्ये येवुन महागडे फोन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद ; ३० लाख रुपयांचे मोबाईल फोन केले जप्त…

विमानतळ पोलीस ठाण्याची उत्तम कामगिरी ; विमानाने पुण्यामध्ये येवुन महागडे फोन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद ; ३० लाख रुपयांचे मोबाईल फोन केले जप्त…

पुणे :- विमानतळ पोलीस ठाणेचे हददीत महालक्ष्मी लॉन्स पुणे नगर रोड येथे दिनांक २४/०२/२०२३ ते दिनांक २६/०२/२०२३ दरम्यान व्हिएववन सुपरसोनिक कॉन्सर्ट या आयोजित कार्यक्रमामध्ये मोबाईल चोरी होत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याअनुषंगाने वपोनि विलास सोडे यांचे आदेशान्वये विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी रविंद्र ढावरे व तपास पथकातील स्टाफ असे सदर ठिकाणी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सपो फौजदार अविनाश शेवाळे यांना एक संशयित इसम दिसला त्यास थांबण्याचा प्रयत्न केला असता तो पळुन जावु लागला. त्यावेळी पोलीस अंमलदार थोपटे व बर्डे यांनी सदर इसमाचा पाठलाग करुन त्यास पकडले. तेव्हा त्याने त्याचे नाव असद गुलजार महंमद रा. दिल्ली असे असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने आम्ही व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट या कार्यक्रमामध्ये मोबाईल फोन चोरी करण्यासाठी दिल्ली येथुन आलो असुन माझे साथीदार हे मिलन हॉटेल, पुणे स्टेशन येथे आहेत. लागलीच वपोनि श्री. विलास सोडे यांना सदरची बातमी कळवून तपास पथकातील अधिकारी व स्टाफ यांनी मिलन हॉटेल पुणे स्टेशन येथे जावुन चार इसमांना ताब्यात घेतले ताब्यात घेतले इसम नामे १) असद गुलजार महंमद वय ३२ वर्षे रा ११६५ सोनारवाली रोड कलामहल उंचा छलान दिल्ली २) निजाम बाबु कुरेशी वय ३५ वर्षे रा. १०६ जवाहर पार्क शालीमार गार्डन साहिबाबाद गाझीयाबाद उत्तरप्रदेश ३) शाहबाज भोले खान वय २६ वर्षे रा गल्ली नं १ कबीर नगर महादेव मंदीराशेजारी दिल्ली ४) राहुल लीलीधर कंगाले वय ३० वर्षे रा बी१/१५१ डी.एल.एफ कॉलनी भोपरा साहीबाबाद गाझीयाबाद उत्तरप्रदेश ५) नदीम इब्राहिम मलीक ४० वर्षे रा सी / ११२ / २० गल्ली नं १९ नॉर्थ गोडा यमुनानगर शेजारी दिल्ली यांचेकडुन एकुण २८,४०,०००/- रुपये किंमतीचे एकुण ३९ महागडे मोबाईल फोन जप्त केलेले आहेत.
तसेच सदर दिनांक २४/०२/२०२३ रोजी मोबाईल फोन चोरी करणारा इसम प्रशांत के. कुमार, मु.पो. भोवी कॉलनी ता. भद्रावती शिमोगा राज्य कर्नाटक यास सुध्दा विमानतळ पोलीस स्टेशन तपास पथकाने ताब्यात घेतले असून त्याचेकडुन एकुण १,८७,०००/- रुपये किंमतीचे एकुण ५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत सदर बाबत गु.र.नं. १०५ / २०२३ भादंविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे असे एकुण ३०,२७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त शशिकांत बोराटे, सहा पोलीस आयुक्त किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन विलास सोंडे, पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता माळी, पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे, समु चौधरी, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, नाना करचे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, शिवराज चव्हाण यांचे पथकाने केलेली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!