Homeताज्या बातम्याआरटीओतील कामासाठी घेतले ७.५ लाख रुपये; दलालाविरुद्ध गुन्हा दाखल पुण्यातील घटना

आरटीओतील कामासाठी घेतले ७.५ लाख रुपये; दलालाविरुद्ध गुन्हा दाखल पुण्यातील घटना

आरटीओतील कामासाठी घेतले ७.५ लाख रुपये; दलालाविरुद्ध गुन्हा दाखल पुण्यातील घटना…

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा सर्व कारभार हा एजंटच्या भरोशावर सुरु असतो. एजंटाशिवाय आरटीओतील कोणतेही काम पूर्ण करणे शक्य होत नाही, असा लोकांचा अनुभव आहे. त्यामुळे आरटीओतील कामांसाठी लोक नाईलाजाने एजंटकडे वळतात.

पण आता एजंटच गंडा घालू लागले असल्याचे समोर आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम मार्गी लावून देण्याच्या आमिषाने साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मिलिंद मधुकर भोकरे (रा. स्वारगेट) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत वाघोली येथील एका नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जाणारी मोटार खासगी वापरासाठी परवानगी देण्याबाबतचा अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दिला होता. आरटीओतील काम करुन देण्याच्या आमिषाने भोकरेने त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ६०० रुपये घेतले. त्यांच्याकडून वाहनाची कागदपत्रे घेतली. त्यानंतर भोकरे याने त्यांचे काम करुन दिले नाही. पैसे परत करण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली.

भोकरेने अशाच पद्धतीने आणखी पाच जणांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. भोकरेने याने फिर्यादी यांच्यासह पाच जणांची ७ लाख ४३ हजार ५५० रुपयांची फसवणूक केली असून, पोलीस उपनिरीक्षक नळकांडे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रुबी हॉल क्लिनिकच्या तेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनचा एमयूएचएसच्या २५व्या पदवीदान समारंभात गौरव;...

0
पुणे, ३१ जुलै २०२६: रुबी हॉल क्लिनिकच्या तेहमी ग्रँट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (TGINE) ने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक यांच्या २५व्या पदवीदान...

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; बावधनमधील नामांकित शिक्षण संस्थेच्या निकाल दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह?

0
'100 टक्के निकाल' की विद्यार्थी-पालकांची तसेच माध्यमांची दिशाभूल? चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): बावधन परिसरातील एका नामांकित शिक्षण संस्थेने...

दोडी जि. प. शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) : दोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

error: Content is protected !!