Homeताज्या बातम्याबनावट डिग्री रॅकेट प्रकरणामध्ये पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांसह, शिक्षणाधिकारी व तीन जणांवर गुन्हा...

बनावट डिग्री रॅकेट प्रकरणामध्ये पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांसह, शिक्षणाधिकारी व तीन जणांवर गुन्हा दाखल…

बनावट डिग्री रॅकेट प्रकरणामध्ये पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांसह, शिक्षणाधिकारी व तीन जणांवर गुन्हा दाखल…
 
पुणे : पुणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ हरिभाऊ बनकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे आणि लिपिक राजेंद्र घारे यांच्यासह इतर काही जणांवर बनावट डिग्री प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलचे तत्कालीन रेक्टर असलेल्या बनकर यांनी सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीची एमबीए (एचआरएम) पदवी बनावट स्वरूपात प्राप्त केली आणि तिची नोंद त्यांच्या सेवा पुस्तिकेत घेतली होती.
बनावट डिग्रीची उघडकीस…
सामाजिक कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी माहिती अधिकाराद्वारे केलेल्या चौकशीत सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीने २०१६ साली बनकर यांच्या नावावर कोणतीही डिग्री नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही महापालिकेने याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. अखेर आल्हाट यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर प्रकरणाला वेग आला.
गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा विलंब…
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तपासादरम्यान बनावट डिग्री असल्याची खात्री करूनही ४ मे २०२४ रोजी महापालिकेला केवळ पत्र देऊन प्रकरण थांबवले होते. तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१८ साली महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करून बनावट डिग्रीचे पुरावे दिले होते.
पाच अधिकाऱ्यांची चौकशी सुरू…
या प्रकरणात महापालिकेच्या आणखी पाच अधिकार्‍यांच्या डिग्री बनावट असल्याचा संशय आहे. आल्हाट यांनी पोलिसांना त्यांची नावे दिली असून या बनावट डिग्री रॅकेटचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महापालिकेतील गंभीर गैरव्यवहार…
२००८ ते २०१६ दरम्यान महापालिकेत हा प्रकार घडला. बनावट डिग्रीच्या आधारे बढती मिळाल्याने महापालिकेच्या प्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे महापालिकेतील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
शिवाजीनगर पोलीस तपास सुरू असून यातील दोषींवर कठोर कारवाईचे संकेत आहेत.
असे पुणे महापालिकेत अनेक प्रकरण…
पुणे महापालिकेत असे अनेक प्रकरणे आहेत. मात्र पुणे महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त हे जाणून बजून सर्व प्रकरणांवर डोळे झाक करत आहेत. आणि ज्यावेळी असे प्रकरण गुन्हे दाखल होत आहेत. त्यावेळेस त्यांच्या लक्षात येत आहेत. यामुळे पुणे महानगरपालिकेचा नाव अत्यंत खराब होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहेत. भविष्यात यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!