Homeताज्या बातम्याअहिल्यानगर – बेलापुरात १३.५२ लाखांचा गुटखा जप्त; पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या...

अहिल्यानगर – बेलापुरात १३.५२ लाखांचा गुटखा जप्त; पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई

श्रीरामपूर:बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेला सुमारे १३ लाख ५२ हजार रुपयांचा गुटखा आणि सुमारे पाच लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण १८ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल बेलापुरात पोलिसांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (ता. १०) सायंकाळी करण्यात आली.

जिल्ह्याचे नव्याने पदभार स्वीकारलेले पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुटखाविरोधातील मोहिमेला श्रीरामपूरपासून सुरुवात करत मोठी कारवाई केली. त्यांच्या गोपनीय सूचनेनुसार शहर व तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने बेलापुरात साई पेट्रोलपंपाजवळील सलमान तांबोळी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

ही कारवाई उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनात पार पडली. यावेळी गुटखा आणि टेम्पो ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन कामगारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. ट्रकचा मालक व गुटख्याच्या मालकाबाबत अधिक तपास सुरु आहे.

घटनेची माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली असून त्यांच्या उपस्थितीत पुढील कारवाई केली जात आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

श्रीरामपूर – गुटख्याचा मुख्य पुरवठा केंद्र?

या घटनेनंतर पुन्हा एकदा श्रीरामपूर हे गुटखा साठवणूक व वितरणाचे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधीही अन्न व औषध प्रशासनाने श्रीरामपूर व बेलापुरात मोठ्या प्रमाणावर गुटखा जप्त केला होता. मात्र, काही वेळा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ‘तोडपाणी’ केल्याचे आरोपही झाले होते.

कठोर पावले उचलणारे पोलिस अधीक्षक

सोमनाथ घार्गे हे यापूर्वीही श्रीरामपूर उपविभागात उपअधीक्षकपदी कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्या कार्यशैलीची प्रशंसा झाली होती. आता जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेताच त्यांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

गुटखाविरोधातील मोहिमेला वेग

ही कारवाई म्हणजे गुटखा विक्रीवर रोख लावण्यासाठी सुरु झालेल्या मोहिमेचा एक भाग आहे. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे अशा कारवाया आणखी वेग घेतील, अशी अपेक्षा  व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!