Homeआरोग्यधक्कादायक घटना: मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या वसतीगृहात MBBS विद्यार्थ्याची आत्महत्या...

धक्कादायक घटना: मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या वसतीगृहात MBBS विद्यार्थ्याची आत्महत्या…

मुंबई :मुंबईतील भायखळा परिसरात स्थित जेजे रुग्णालयाच्या वसतीगृहात एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव रोहन रामफेर प्रजापती असे असून, त्याने सोमवार (१० जून) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आपल्या खोलीत आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

रोहन प्रजापती हा जेजे रुग्णालयाच्या वसतीगृहात राहत होता आणि तिसऱ्या वर्षाचा वैद्यकीय अभ्यासक्रम करत होता. प्राथमिक माहितीनुसार, अभ्यासाचा वाढता ताण आणि घरातील आर्थिक अडचणी यामुळे रोहन मानसिक तणावाखाली होता. या तणावाला कंटाळून त्याने पंख्याला गळफास लावून आयुष्य संपवलं.

घटनेनंतर साथीदारांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणतीही प्रतिक्रिया न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी रोहन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मध्यरात्री त्याला मृत घोषित केलं.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

या प्रकरणी जेजे मार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी तपास करत असून, प्राथमिक चौकशीत आत्महत्येमागे अभ्यासाचा दडपण आणि आर्थिक संकट हेच प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्याच्या आत्महत्येने महाविद्यालयीन वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे.

याआधी पुण्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. रूबी क्लिनिकमध्ये कार्यरत असलेल्या एका २८ वर्षीय डॉक्टरने वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनांनी वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांवरील तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणी वर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!