Homeराजकीयइम्तियाज जलील यांचे सरकारला थेट आव्हान: "हिम्मत असेल तर पुण्याचे नाव फुलेवाडा,...

इम्तियाज जलील यांचे सरकारला थेट आव्हान: “हिम्मत असेल तर पुण्याचे नाव फुलेवाडा, कोल्हापूरचे शाहू महाराजांवर करा”

संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून AIMIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत थेट आव्हान दिले आहे. “जर इतिहासाचा दाखला देऊन शहरांची नावे बदलायची असतील, तर पुण्याचे नाव फुलेवाडा, कोल्हापूरचे नाव शाहू महाराजांवर आणि नागपूरचे नाव बाबासाहेब आंबेडकर नगरी करावे,” असे जलील यांनी म्हटले आहे. सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून सुरू असलेल्या राजकारणावरही भाष्य केले.

जलील यांनी मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, नामांतरापेक्षा आज रस्ते, पाणी आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. “मी मुस्लिम आहे म्हणून लोक मला जातीच्या दृष्टिकोनातून पाहतात. मी असे राजकारण करत नाही. गेल्या 40 वर्षांपासून औरंगाबादच्या नावावरून फक्त राजकारण सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा पुढे आणला जातो, हे दुर्दैवी आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नामांतरापेक्षा मूलभूत प्रश्न महत्त्वाचेजलील यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून सरकारवर राजकारणाचा आरोप केला. “आंतरराष्ट्रीय स्तरावर औरंगाबादची ओळख आहे. येथे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. पण आज आपल्याकडील सर्व प्रश्न सुटले आहेत का? ज्या संभाजी महाराजांच्या नावावर हे शहर ठेवण्यात आले, त्या शहरात आजही 10 दिवसांनी पिण्याचे पाणी येते. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇

Advertisement by Unique Computers
👆👆Click the Image below👆👆

हिम्मत असेल तर नावे बदला””

जर इतिहासाचा मुद्दा पुढे करून शहरांचे नामांतर करायचे असेल, तर सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली, मग पुण्याचे नाव फुलेवाडा करावे. नागपुरात दीक्षाभूमी आहे, तर नागपूरचे नाव बाबासाहेब आंबेडकर नगरी करावे. कोल्हापूरला शाहू महाराजांमुळे ओळख आहे, मग कोल्हापूरचे नाव शाहू महाराजांवर करावे. हिम्मत असेल तर सरकारने ही नावेही बदलावीत,” असे थेट आव्हान जलील यांनी सरकारला दिले

.नामांतरावरून राजकारण नकोजलील यांनी संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. “माझा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला नाही. पण नामांतराच्या नावाखाली राजकारण करणे चुकीचे आहे. औरंगाबादच्या नावावरून गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय खेळ खेळला जात आहे. त्याऐवजी मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे,” असे ते म्हणाले

.या मुलाखतीत जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला असून, त्यांच्या या आव्हानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!