Homeताज्या बातम्याजागतिक पर्यावरण दिनानिमित्त जय भवानी सहकारी साखर कारखान्यात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जय भवानी सहकारी साखर कारखान्यात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दिनांक ०५ जून २०२६ रोजी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून साखर कारखान्याच्या कामगारांनी जनजागृतीपर पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने साखर कारखान्याच्या परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे आयोजन साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात साखर कारखान्याच्या विविध परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आले कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप मुख्यलेखापाल सौरभ कुलकर्णी कार्यालयीन अधीक्षक गोविंद चव्हाण प्रोडक्शन मॅनेजर गजानन वाळके डिसलरी इन्चार्ज राजेंद्र बडे लेबर ऑफिसर सचिन उदे शेतकी अधिकारी वशिष्ठ कुठे ईडीपी मॅनेजर धनंजय भोसले यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी कामगार सरपंच गोपाळ शिंदे ऋषिकेश शिंदे महेश गुंजाळ भाऊसाहेब चव्हाण गार्डन इन्चार्ज गणेश बरकसे परमेश्वर सागरे यावेळी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरणाचे महत्त्व, वृक्षसंवर्धन, जलसंधारण, प्लास्टिकमुक्त परिसर निर्मिती आणि स्वच्छतेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच पर्यावरण विषयक संदेश असलेले फलक हातात घेऊन कारखाना परिसरात जनजागृती रॅली काढण्यात आली.

जवळपास 2000 वृक्षाची लागवड यावेळी करण्यात आली यामध्ये चिंच आंबा जांभळ फणस अंजीर या वृक्षाचा यामध्ये समावेश आहे यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप यांनी पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. यावेळी “एक अधिकारी एक कामगार एक कर्मचारी एक वृक्ष” ही मोहीमही राबविण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाची शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!