Homeताज्या बातम्यापिशोर पोलिसांची धडक कारवाई; अवैध देशी दारूसह दुचाकी जप्त, आरोपी ताब्यात

पिशोर पोलिसांची धडक कारवाई; अवैध देशी दारूसह दुचाकी जप्त, आरोपी ताब्यात

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी संतोष खाजेक) : पिशोर, दि. 5 जून पिशोर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करत ₹1 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 5 जून रोजी रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास दिगाव-शेलगाव रोडवरील पावरहाऊसजवळ करण्यात आली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास विठ्ठल मनगटे (वय 52 वर्षे, रा. शेलगाव, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) हा अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला.

कारवाईदरम्यान त्याच्या ताब्यातून संजीवनी संत्रा देशी दारूच्या 180 मिली क्षमतेच्या 384 बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत ₹46,080 असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली डिस्कव्हर बजाज मोटारसायकल (किंमत ₹60,000) देखील जप्त करण्यात आली.
अशा प्रकारे एकूण ₹1,06,080 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
प्राथमिक तपासात आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी देशी दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने सदर दारू स्वतःच्या ताब्यात बाळगून मोटारसायकलवरून वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 165/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) व 65(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. अपराजिता अग्निहोत्री यांच्या आदेशानुसार पार पडली. या कारवाईत पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक फरताडे, सफौ कराळे, पोशी गणेश कव्वाल व देवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या या कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गोरगरीबांसाठी ‘देवदूत’ ठरत आहेत तहसीलदार अजय सकुंदरवार

0
सिरोंचा (प्रतिनिधी जाबिर खान) : सिरोंचा तालुक्याचे तहसीलदार अजय सकुंदरवार हे आपल्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे, तत्पर प्रशासनामुळे आणि जनतेप्रती असलेल्या संवेदनशील दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये विशेष लोकप्रिय...

खराडीत जमीन वादाला हिंसक वळण; नगरसेविकेचे पती प्रीतम खांदवे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

0
पुणे: खराडी परिसरातील एका जागेच्या वादातून सुरक्षारक्षकास मारहाण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेतील नगरसेविकेच्या पतीसह आठ जणांविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या...

माजी सैनिक स्व दत्तात्रय शिंदे यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे): स्वर्गीय दत्तात्रय शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि १० जून रोजी उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन, रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम व वृक्षारोपण...

आलेगाव-खोरवडी परिसरात मध्यरात्री सशस्त्र दरोडा; ७.१० लाखांचा ऐवज लंपास

0
दौंड (प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड): दि. १० जून : दौंड तालुक्यातील आलेगाव व खोरवडी परिसरात मध्यरात्री पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत...

दौंडच्या इतिहासात मानाचा तुरा; बारसा बॉईज फुटबॉल क्लबची चौथी भव्य स्पर्धा उत्साहात संपन्न

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड): बारसा बॉईज फुटबॉल क्लब, दौंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली चौथी वार्षिक फुटबॉल स्पर्धा दिनांक ६ व ७ जून रोजी उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!