Homeताज्या बातम्याअजित दादांच्या राष्ट्रवादीचा हाच का सेक्युलरपणा ; मुस्लिम समाजाची बाजू मांडणाऱ्या नेत्यांची...

अजित दादांच्या राष्ट्रवादीचा हाच का सेक्युलरपणा ; मुस्लिम समाजाची बाजू मांडणाऱ्या नेत्यांची नावे यादीतून हटवली

आमदार मिटकरी, रुपाली ठोंबरेन आणि संग्राम जगतापांना विरोध करणारे सलीम सारंग यांना केला यादीतून बाहेर…

Times of Maharashtra Desk: काही दिवसांपासून आजीत दादांच्या राष्ट्रवादीमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. रूपाली ठोंबरे आणि चाकणकर प्रकरण असो वा सलीम सारंग प्रकरण असो, अजित दादाच्या पक्षात आपापसातील मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत. सध्या आगामी निवडणुकीची घोषणा झाल्यापासून अजित दादांच्या पक्षात मोठी उलाढाल होत आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुस्लिम समाजाशी निगडित विषयांवर भूमिका मांडणाऱ्या नेत्यांची अडचण वाढत असल्याची चर्चा सुरू आहे. अजित दादानी मुस्लिमांची पाठराखण करणाऱ्या नेत्यांना यादीतून वागल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यामुळे अजित पवारांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे असा टोला अजित दादाना मारला जात आहेत.

पक्षात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे मुस्लिम नेतृत्वाकडे दुर्लक्ष होतेय का?
रूपाली ठोंबरे पाटील आणि सलीम सारंग यांनी काही दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांच्या बाजूने भाष्य केले होते. त्यांची ही प्रकरणे चांगलीच चर्चेत आली होती. रूपाली ठोंबरे पाटील यांचे प्रवक्तापद काही दिवसांपूर्वी अचानक काढून घेण्यात आले होते. रूपाली पाटील यांनी शनिवार वाड्यात झालेल्या नमाज पठण प्रकरणी मुस्लिम समाजाची भूमिका मांडली होती. ही प्रकरण होताच त्यांचे प्रवक्ते पद काढले तर आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कोणत्याही जवाबदारीच्या पदावर त्याचे नाव टाकण्यात आले नाही. यामुळे मुस्लिम समाजाची भूमिका मांडली म्हणून त्यांचे नाव यादीतून वगळले का असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे तर दुसऱ्या बजूला सलीम सारंग यांनी संग्राम जगताप यांना उघडपणे विरोध केला होता त्याच्या या विरोधामुळे त्यांचे नाव यादीत नाही असा आरोप देखील अजित दादांवर केला जात आहे.

यादीतून कोणाकोणाची नावे हटवली? तटकरेंकडून दादाच्या जवळच्या नेत्यांना धोका..?
निवडणूकीची घोषणा होताच अजित दादांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात गटबाजी होताना दिसत आहेत. पक्षातील नेत्यांमधील मतभेद देखील वाढत आहेत.अजित दादानी नुकतीच स्टार प्रचारकांची यादी प्रसारित केली आहे. या यादीत २०२४ मध्ये स्टार प्रचारक असलेल्या अनेक मोठ्या नेत्यांना २०२५ मध्ये नवीन यादीतून वगळण्यात आले आहे. मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनेत्रा पवार, अविनाश आदीक, मंत्री दिलीप वळसे, राज्याचे उपाध्यक्ष सलीम सारंग विद्यार्थी राष्ट्रीय अध्यक्ष चैतन्य मानकर, खासदार नितीन पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक असेल चे राष्ट्रीय अध्यक्ष जलीलुद्दीन सय्यद, आणि युवक राष्ट्रीय अध्यक्ष धिरज शर्मा यांची नावे यादीतून हटवण्यात आली आहेत. या सर्वांची नवे हटवण्यामागे सुनील तटकरे जबाबदार आहेत अशी चर्चा सध्या रंगली आहे. खरतर यादीतून वागळलेले सर्व नेते अजित दादांच्या आगदी जवळचे आहेत, त्यामुळे ताटकरेंकडून या सर्वाना बाजूला ठेवण्यात आल्याच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. देशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील मतभेद वाढले असून त्याचा फटका पक्षातील काही नेत्यांना बसत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडूनच केला जात आहे. अजित पवार यांच्यावर मुस्लिम समाजातील प्रश्नांवर भूमिका घेणाऱ्या नेत्यांना बाजूला सारल्याचा आरोप केला जात असला तरी पक्षाकडून या सर्व प्रश्नावर अद्यापही कोणतेच वक्तव्य करण्यात आलेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!