Homeताज्या बातम्यासलीम सारंग यांच्या मागणीची अजित पवारांकडून दखल; संग्राम जगताप यांच्या विधानावर स्पष्टीकरणाची...

सलीम सारंग यांच्या मागणीची अजित पवारांकडून दखल; संग्राम जगताप यांच्या विधानावर स्पष्टीकरणाची मागणी…

मुस्लिम समाजाकडून सलीम सारंग यांना भरघोस पाठिंबा!
संग्राम जगतापांना अजित पवारांनी फटकारलं?

मुंबई (संपादक मुज्जम्मील शेख): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मुस्लिम विरोधी विधानाचा तीव्र निषेध करत पक्षाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या या ठाम भूमिकेची अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दखल घेतली असून, त्यांनी संग्राम जगताप यांच्याकडून स्पष्टीकरण मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस ही शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी धर्मनिरपेक्ष पार्टी आहे. कोणत्याही धर्माविरोधात बोलणे पक्षाच्या तत्त्वधारेच्या विरोधात आहे. संग्राम जगताप यांनी नेमकं काय आणि का बोललं, हे मी त्यांच्याकडून विचारणार आहे.”

या वक्तव्यानंतर सलीम सारंग यांच्या मागणीची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या निर्णायक भूमिकेमुळे मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांनी सलीम सारंग यांना शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केली आहे. सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी सलीम सारंग यांचे कौतुक केले असून, त्यांना समाजाच्या न्यायासाठी उभा राहणारा खरा नेता म्हणून गौरवले आहे. सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या या ठाम आणि निर्भीड भूमिकेमुळे त्यांची राजकीय प्रतिमा अधिक बळकट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे पक्षामध्ये निर्माण झालेला अंतर्गत मतभेदाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, आता संग्राम जगताप यांच्यावर पक्ष कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र एक गोष्ट नक्की — सलीम सारंग यांनी आपल्या पक्षाच्या मूलभूत मूल्यांसाठी आवाज उठवून एक सकारात्मक उदाहरण समोर ठेवले आहे.

कोण आहेत सलीम सारंग?
“सलीम सारंग हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असून, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या संस्थेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने काम केले असून त्यांचा समर्थक वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी त्यांनी देशभर व राज्यभर व्यापक दौरे केले आहेत.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!