Times of Maharashtra Desk:भारतीय लष्कराने अलिकडेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ने विकसित केलेल्या आकाश प्राइम संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. आकाश प्राइम ही आकाश संरक्षण प्रणालीची नवीन आणि सुधारित आवृत्ती आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान या प्रणालीने उत्कृष्ट कामगिरी केली आणि जगाचे लक्ष वेधून घेतले. भारताने या क्षेपणास्त्र प्रणालीसाठी आर्मेनियाशी करार केला आहे, आणि तुर्कीच्या संरक्षण तज्ञांनीही तिची क्षमता मान्य केली आहे.ही प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली भारताची स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकाश प्राइम अनेक इतर देशांच्या समान प्रणालींपेक्षा खूपच कमी खर्चात विकसित करण्यात आली आहे.
डीआरडीओने विकसित केलेल्या या प्रगत क्षेपणास्त्र प्रणालीची लडाखमध्ये भारतीय सैन्याने यशस्वी चाचणी घेतली. चाचणी दरम्यान, क्षेपणास्त्र प्रणालीने १५,००० फूटांपेक्षा जास्त उंचीवर आपल्या हाय-स्पीड हवाई लक्ष्यांवर यशस्वीरित्या पोहचली.आकाश प्राइम ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टमची यशस्वी चाचणी भारतासाठी मोठी कामगिरी मानली जात आहे. या चाचणीमुळे भारताची लष्करी तयारी आणि आधुनिक तंत्रज्ञानावरची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, ही चाचणी केवळ संरक्षण क्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर आर्थिक आणि तांत्रिक स्वावलंबनाच्या दिशेनेही भारताने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली ही प्रणाली भविष्यात निर्यात संधी वाढवून देशाच्या संरक्षण उद्योगाला व्यावसायिक पातळीवरही बळकटी देणारी आहे.
या चाचणीत ही सिद्ध झाले आहे की आकाश प्राइम सर्व हवामान आणि भूभागात अचूकतेने प्रहार करण्यास सक्षम आहे. डीआरडीओने विकसित केलेली आकाश प्राइम संरक्षण प्रणाली ही त्यांच्या मागील आकाश प्रणालीची नवीनतम अद्ययावत आवृत्ती आहे, जी स्वदेशी सक्रिय रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजेच आरएफ सीकरने सुसज्ज आहे. ही रेडिओ फ्रिक्वेन्सी आकाश प्राइम ॲडव्हान्स मिसाईल सिस्टमची सर्व हवामान आणि भूभागात सुधारित अचूकतेने प्रहार करण्याची क्षमता वाढवणारी आहे. भारतीय सैन्यात आकाश प्राइमचा समावेश आकाश एअर डिफेन्स सिस्टीमच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेजिमेंटमध्ये केला जाईल. यामुळे देशाचे हवाई संरक्षण कवच आणखी मजबूत होईल. ही क्षेपणास्त्र प्रणाली पाकिस्तान आणि चीनच्या कोणत्याही संभाव्य हालचालींना हाणून पाडण्याची भारताची क्षमता असणार आहे.
या आकाश प्राइमचे विशेष म्हणजे ही एकदम कमी किमतीत जास्त माजबूतदार बनवण्यात आली आहे. आकाश प्राइमॲडव्हान्स डिफेन्स सिस्टीमबद्दल, त्याची प्रति युनिट किंमत अद्याप सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलेली नाही . परंतु त्याच्या स्वदेशी विकासामुळे ही क्षेपणास्त्र प्रणाली जागतिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या इतर समान प्रणालींपेक्षा अधिक किफायतशीर असून मिळालेल्या काही अहवालांनुसार, संपूर्ण आकाश क्षेपणास्त्र प्रणाली विकसित करण्यासाठी अंदाजे ₹१,००० कोटी खर्च आला आहे. या आकाश प्राइम मिसाईल मुळे भारत आता कमी किमतीत उच्च दर्जाचे संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यास सक्षम आहे. यामुळे चीन आणि पाकिस्तानसाठी तणाव वाढू शकतो, कारण इतर देशांमध्ये विकसित केलेली समान संरक्षण प्रणाली भारताच्या तुलनेत ८ ते १० पट जास्त किमतीची आहेत.






















