Homeताज्या बातम्याअपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले यांचे निधन

अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले यांचे निधन

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील तलवाडा येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब आठवले (वय ५०) यांचे गुरुवारी (दि. २ मे) झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आठवले हे गेवराईहून तलवाड्याकडे दुचाकीवरून जात असताना दैठण फाटा, सुतगिरणी परिसरात समोरून येणाऱ्या टाटा पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

बाबासाहेब आठवले यांचा तलवाडा परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क होता. त्यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते.

त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित तसेच गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी तीव्र दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. “बाबासाहेब आठवले यांच्या निधनाने तलवाडा परिसरात पक्षाची मोठी हानी झाली आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणीला विरोध; ब्रह्मपुरीत ओपीडी, आयपीडी ठप्प!

0
ब्रह्मपुरी राज्य शासनाने १ वर्षाचा मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स सीसीएमपी केलेल्या होमिओपॅथी बीएचएमएस डॉक्टरांना थेट महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये एमएमसी नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे या...

error: Content is protected !!