Homeताज्या बातम्याड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार संदीप धुनिया कुवेतला; ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट...

ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार संदीप धुनिया कुवेतला; ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट…

पुणे : पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात सुरू केलेल्या धडाकेबाज कामगिरीत या रॅकेटचा सूत्रधार संदीप धुनिया असल्याचे समोर आले आहे. हा संदीप धुनिया २०१६ मध्ये महसूल गुप्तचर संचलनालयाने केलेल्या कारवाईतदेखील मुख्य आरोपी होता.

ही कारवाईदेखील त्यावेळी कुरकुंभ एमआयडीसीमध्येच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी १५९ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले होते.

धुनियाकडे ब्रिटिश पासपोर्ट असल्याने, त्याला भारतात येण्यासाठी व्हिसाची गरज नाही. याच संधीचा फायदा घेऊन त्याने ड्रग्ज रॅकेट चालवण्याचा धंदा सुरू केला होता. ३० जानेवारी रोजी संदीप नेपाळ-काठमांडूमार्गे कुवेतला पळाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. धुनिया मूळचा बिहार, पाटणा येथील आहे. त्याच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. बिपिनकुमार त्याचा मित्र होता. तो सध्या अमली पदार्थाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. सोनम पंडित ही बिपिनकुमारची पत्नी आहे. मात्र, धुनिया याने तिला आपली गर्लफ्रेंड बनवले. याबाबत बिपिनच्या वडिलांनी तेथील स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आतापर्यंत पोलिसांनी १७५० ते १८०० किलो मेफेड्रॉन जप्त केले आहे. तसेच, आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

विदेशात मेफेड्रॉनची विक्री करण्याची मदार धुनियावर होती. धुनिया यानेच मुंबईतील एका व्यक्तीशी संपर्क केला होता. तर अन्य आरोपी मकानदार हा धुनियासोबत २०१६च्या ड्रग्जच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात जेरबंद होता. पोलिसांनी या रॅकेटची पाळेमुळे खोदण्यासाठी कंबर कसली आहे.

दरम्यान, गुरुवारी (दि. २२) ‘एनसीबी’चे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) एक पथक पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाले. यासोबतच ड्रग्ज नेटवर्कमध्ये दहशतवादी संघटना देखील यापूर्वी सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने एटीएस, एनआयए या तपास यंत्रणांनीदेखील याप्रकरणी तपास सुरू केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नेत्यांच्या सावलीत नगरसेवक! जनतेची कामे बाजूला, राजकीय वादातच वेळ वाया.

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नॅशनल न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘टिकीट संस्कृती’चा शिरकाव; विकासकामांऐवजी राजकीय वादांमध्ये रममाण होणाऱ्या प्रतिनिधींवर नागरिकांचा रोष. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका...

अतिक्रमण, खड्डे, पाण्याचे डबके; गणेशोत्सवापूर्वी शहर स्वच्छतेवर महासभेत चर्चा

0
जळगाव :(प्रतिनिधी विनोद पवार)जळगाव शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या महासभेत अतिक्रमण हटविणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे,...

निफाड नगरपंचायतीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद : प्रथमच बौद्ध समाजातील महिला अरुंधतीताई पवार नगराध्यक्षपदी विराजमान

0
निफाड:( प्रतिनिधी योगोश कर्डीले)  निफाड तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णाक्षराने नोंद होणारी घटना घडली. निफाड नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच एससी वर्गातून बौद्ध समाजातील महिला लोकप्रतिनिधी...

सातव्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची मागणी; पोलीस महासंचालकांकडे निवेदन

0
रायगड:(प्रतिनिधी दिनेश चाफळकर) महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार १५ दिवसांच्या अर्जित रजेचे (Earned Leave) रोखीकरण लागू करून १ जानेवारी २०१६...

फराळ वाटपासाठी एफडीए परवाना बंधनकारक; नियमांचे काटेकोर पालन करा अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना आदेश

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) आषाढी वारी पूर्वतयारी बैठक संपन्न; भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर येथे लाखो वारकऱ्यांच्या...

error: Content is protected !!