Homeताज्या बातम्याराष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी...

राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी…

राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी…

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असणाऱ्या ऑर्गनायझर मध्ये छापून आलेल्या एका लेखामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ‘मोदी ३.० : कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन’ या मथळ्याखाली छापून आलेल्या या लेखात अजित पवार यांना सोबत घेतल्याने भारतीय जनता पक्षाचं नुकसान झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

यावर आता खुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आज पुण्यात झालेल्या बैठकांनंतर अजितदादांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार म्हणाले, की मला त्याबद्दल काही बोलायचे नाही. लोकसभा निवडणुकांनंतर अनेक राजकीय पक्षांची लोक आपली मत व्यक्त करतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांच्यावर मला कोणतीगी टीका टिपण्णी करायची नाही. मी विकासात लक्ष घालत आहे, महत्त्वाची कामे कशी मार्गी लागतील याकडे लक्ष दिलं आहे. नव्या उमेदीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचं आहे, असंही अजित पवार म्हणाले.

‘ऑर्गनायझर’मधील लेखात काय आहे?

‘महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी करून घेतली’, असं या लेखात म्हटलं आहे.

आषाढी वारीच्या तयारीची बैठक

दरम्यान, पुण्यातील बैठकीत आषाढी पायी वारीबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. पुणे, सोलापूर, सातारा येथून दोन्ही संत यांची पालखी जाते. पालखीचा विसावा अनेक ठिकाणी असतो. तिथली व्यवस्था, वारकरी, दिंडीप्रमुख अनेक लोकं जातात. अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे तिथे व्यवस्था पाहावी लागणार आहे. १५ लाख लोकं पंढरपूरमध्ये जमतील. विभागीय आयुक्त या क्षेत्रातील अनेक लोकांसोबत आज बैठक घेण्यात आली. विविध सूचना देण्यात आल्या आहेत. काही सूचना आम्ही स्वीकारल्या आहेत. काही निधी राहिला होता, त्याचा जी आर सुद्धा पोहचला आहे. सुरक्षा, स्वच्छता या संदर्भात काळजी राज्य सरकारने घेतली आहे, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!