Homeताज्या बातम्यादोन बांगलादेशी नागरिकांसह भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे बनवणारा नवी मुंबई पोलिसांनी केले...

दोन बांगलादेशी नागरिकांसह भारतीय असल्याची बनावट कागदपत्रे बनवणारा नवी मुंबई पोलिसांनी केले जेरबंद…

नवी मुंबई : (संपादक मुज्जम्मील शेख) कोपरखैरणे भागात बेकायदा भारतात वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तसेच या दोघांना भारतीय असल्याचे दाखवणारी बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या एजंटलाही अटक करण्यात आली असून, अन्य एक आरोपी फरार आहे.

दुल्लू प्रधान व फिरदोस शिकदार, अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे बांगलादेशी नागरिक कोपरखैरणेत वास्तव्य करीत असल्याची माहिती अनौतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर एक एप्रिलला दुपारी दोनच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर १, पार्वती प्रोव्हीजन जवळ सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा मागितल्यावर त्यांनी पॅन कार्ड व आधार कार्ड दाखवले. मात्र दोन्ही बनावट असल्याशी शंका आल्याने पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता त्यांनी सदर आधार कार्ड व पॅन कार्ड हे एजंट गंगाप्रसाद तिवारीकडून बनविले असल्याचे सांगितले. त्यावरून गंगाप्रसाद तिवारी यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे अधिकचे पॅन कार्ड व आधार कार्ड मिळून आले. तसेच नगरसेवक यांचा रबरी शिक्का व सदरचा शिक्का वापरलेली कागदपत्रे मिळून आलीत.

गंगाप्रसाद तिवारी याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने नगरसेवक यांचा बनावट रबरी शिक्का वापरून त्या आधारे रहिवासी दाखले बनवून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित इसमांना पॅन कार्ड व आधार कार्ड बनवून दिले असल्याबाबतची कबुली दिली. सदर तीनही व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १०९ बनावट पॅन कार्ड व ११ बनावट आधार कार्ड व नगरसेवक यांचा बनावट रबरी शिक्का जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींचा सहकारी फैयाज याचा शोध सुरू आहे. भारतीय पासपोर्ट अधिनियमसह विदेशी नागरिक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!