कोंढव्यातील एकता सोशल कमिटी यांच्याकडून दिपावली साजरी…
पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशन येथे कोंढवा भागातील मुस्लिम युवक एकता सोशल कमिटी यांच्याकडून 22 ऑक्टोबर शनिवारी पोलिसांसोबत दिवे लावून दिपावली साजरी करून हिंदू – मुस्लीम एकतेचे प्रतीक कोंढाव्यात दिसून आले. यावेळी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील व आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच कोंढवा भागातील महावितरण विभागाचे कार्यलयात देखील दिवे लावून दिवाळीचे शुभेच्छा देण्यात आले.




















