Homeताज्या बातम्यापुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांनी रचला सराफाच्या लूटीचा कारस्थान; झटपट पैसे कमावण्यास केला...

पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांनी रचला सराफाच्या लूटीचा कारस्थान; झटपट पैसे कमावण्यास केला गुन्हा…

पुणे महापालिकेच्या कंत्राटी कामगारांनी रचला सराफाच्या लूटीचा कारस्थान; झटपट पैसे कमावण्यास केला गुन्हा…

पुणे :- घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रस्त्यावर सराफावर गोळीबार करून लुटमार करणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट पाच आणि वानवडी पोलिसांच्या पथकाने गजाआड केले. पुणे महापालिकेच्या कचरा संकलन गाडीवर कंत्राटी पद्धतीने काम करणारे तीन कामगार लुटीत सामील झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.लुटमार करणाऱ्या चोरट्यांकडून आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.सर्फराज शेख (२३), लखन अंकोशी (३५, दोघे रा. रामटेकडी, हडपसर), रफीक शब्बीर शेख (३०, रा. घोरपडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रतीक मदनलाल ओसवाल (३०, रा. मुंढवा) असे जखमी झालेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. हडपसर भागातील सय्यदनगर परिसरात ओसवाल यांची सराफी पेढी आहे. ७ ते ८ नोव्हेंबर रोजी सराफी पेढी बंद करून रात्री साडेनऊच्या सुमारास प्रतीक आणि त्यांचे वडील मदनलाल बी. टी. कवडे रस्त्यावरून निघाले होते.

त्यावेळी सर्फराज, रफीक, लखन आणि साथीदारांनी बी. टी. कवडे रस्त्यावर दुचाकीस्वार प्रतीक यांना अडवले. त्यांच्या दिशेने पिस्तुलातून बेछूट गोळीबार केला. त्यांच्याकडील सोने लुटून आरोपी पसार झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून समांतर तपास सुरू करण्यात आला. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी चोरट्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या.पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. पोलिसांनी तपास करून तिघांना पकडले. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, संजय पतंगे, उपनिरीक्षक चैत्राली गपाट, लोहोटे आणि पथकाने ही कामगिरी केली.

झटपट पैसे कमावण्यासाठी लूट…
आरोपी सर्फराज, रफीक आणि लखन महापालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीवर कंत्राटी पद्धतीवर काम करत होते. झटपट पैसे कमाविण्यासाठी त्यांनी सराफ व्यावसायिकाला लुटण्याचा कट रचला. ते प्रथम सय्यदनगर परिसरातील ओसवाल यांच्या पेढीजवळ गेले.मात्र, गर्दी असल्याने त्यांनी लूट करण्याचे टाळले. त्यानंतर सराफी पेढी बंद करून निघालेल्या दुचाकीस्वार ओसवाल यांचा पाठलाग सुरू करून गोळीबार केला. झटपट पैसे कमाविण्यासाठी आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तिघे आरोपी मित्र आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात

0
वाळूज महानगरछ(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाळूज ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला...

वारसाहक्काच्या राजकारणाने देशाचे भविष्य गहाण ठेवले; आता अ-राजकीय तरुण नेतृत्वाचीच गरज!

0
निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आपल्या देशात आहे. पण हा...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्साहात साजरी

0
सिन्नर : (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने...

सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन

0
सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन विष्णु गायकवाड (तालुका प्रतिनिधी गेवराई) गेवराई, दि. ३१ (प्रतिनिधी) नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते टाकळगाव बॅरेजचे भूमिपूजन संपन्न

0
सिंदफणा नदीवरील सात बॅरेजच्या कामांसाठी मुख्यमंत्र्यांना बोलणार---- सुनेत्राताई पवार अमरसिंह आणि आ. विजयसिंह पंडित यांनी शब्द पाळला विष्णु गायकवाड तालुका (प्रतिनिधी गेवराई) दि. ३१ (प्रतिनिधी) सिंदफणा नदी पाणीदार...

error: Content is protected !!