Homeताज्या बातम्याकामगार वाहतूक की वाहतूक कोंडी? दौंडकर त्रस्त! ही कोंडी थांबणार कधी?

कामगार वाहतूक की वाहतूक कोंडी? दौंडकर त्रस्त! ही कोंडी थांबणार कधी?

संघराज गायकवाड,राहुल आढाव  (दौंड प्रतिनिधी) : कुरकुंभ एमआयडीसी येथील विविध कंपन्यांमध्ये काम करणारे अनेक कामगार दौंड शहरात वास्तव्यास असून ते रोज खासगी ट्रान्सपोर्ट गाड्यांमधून कामासाठी ये-जा करतात. या गाड्या कामगारांना आणण्यासाठी व सोडण्यासाठी थेट दौंड शहरातील वर्दळीच्या भागात प्रवेश करत असल्याने शहरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होत आहे. विशेषतः सरपंच वस्ती आणि शालिमार चौक या परिसरात सकाळी व संध्याकाळी या ट्रान्सपोर्ट गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. हे दोन्ही भाग बाजारपेठ आणि दैनंदिन वर्दळीचे केंद्र असल्याने याठिकाणी वारंवार वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या ट्रान्सपोर्ट गाड्या थेट अरुंद रस्त्यांमध्ये व चौकांमध्ये शिरल्यामुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच पादचाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. काही वेळा अचानक ब्रेक, वळणं आणि थांबे यामुळे अपघाताचीही भीती व्यक्त केली जात असून शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा परिसर अधिक धोकादायक ठरत आहे.

सध्या सरपंच वस्ती व शालिमार चौक परिसरात कामगार वाहतूक गाड्यांची वाढलेली ये-जा ही दौंड शहरातील वाहतूक समस्येचे गंभीर कारण ठरत असून, गर्दीच्या भागात अशा मोठ्या वाहनांच्या प्रवेशामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसून येत आहे. या संपूर्ण प्रकाराची दखल घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) पुणे ग्रामीण तसेच दौंड पोलीस स्टेशन यांनी तातडीने बंदोबस्त व वाहतूक नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

error: Content is protected !!