Homeआरोग्यवडगावशेरीत जीवघेणा लोखंडी पोल कायम; अनेक महिन्यांपासून पुणे मनपा प्रशासन झोपेतच?

वडगावशेरीत जीवघेणा लोखंडी पोल कायम; अनेक महिन्यांपासून पुणे मनपा प्रशासन झोपेतच?

Times of Maharashtra Desk, Pune :  वडगावशेरी परिसरातील बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी टाईम्स ऑफ महाराष्ट्रने १६ डिसेंबर २०२५ रोजी सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीनंतर महापालिकेने संबंधित 40×20 आकाराचे होर्डिंग हटवण्याची कारवाई केली; मात्र आजतागायत त्या होर्डिंगचा मुख्य लोखंडी आधारस्तंभ (पोल) तसाच उभा असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सर्वे क्र. 46/6, मौजे वडगावशेरी येथील या बेकायदेशीर होर्डिंगबाबत माजी नगरसेवकांनी 15 एप्रिल 2025 रोजी तक्रार दाखल केली होती. तब्बल 120 दिवस कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनावर टीका झाली. माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर होर्डिंग हटवण्यात आले, पण अर्धवट अवस्थेतील गंजलेला पोल मात्र तिथेच सोडण्यात आला आहे.

अपघाताची वाट पाहताय का? – नागरिकांचा सवाल

स्थानिक रहिवाशांच्या मते,

  • पोल गंजलेला असून त्याची स्थिती धोकादायक आहे.
  • जोरदार वारा, पावसाळी परिस्थिती किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास तो कधीही कोसळू शकतो.
  • परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते; लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचारी यांची सतत वर्दळ असते.

यापूर्वी महापालिकेने ही जागा अतिक्रमण म्हणून रिकामी केली होती. त्याच ठिकाणी उभारलेल्या बेकायदेशीर होर्डिंगवर मोठ्या संघर्षानंतर कारवाई झाली, पण पूर्णपणे धोका दूर करण्याऐवजी पोल अर्धवट सोडून देणे हे प्रशासनाचे निष्काळजीपणाच दर्शवते, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

संवेदनशील परिसरात दुर्लक्ष?

या ठिकाणापासून काही अंतरावरच 9 BRD Air Station असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. अशा भागात कोणतेही अनधिकृत, धोकादायक स्ट्रक्चर कायम ठेवणे हे नियमबाह्य असून गंभीर सुरक्षाधोका निर्माण करणारे आहे, असे जाणकारांचे मत आहे.

प्रशासनाला थेट इशारा

महापालिकेने तातडीने उर्वरित पोल हटवून संभाव्य अपघात टाळावा. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

वडगावशेरीतील हे प्रकरण पुन्हा एकदा महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. अखेर प्रशासन पूर्ण आणि जबाबदारीने कारवाई करणार की अपघाताची वाट पाहणार?

आता संपूर्ण वडगावशेरीचे लक्ष महापालिकेच्या पुढील पावलाकडे लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!