Homeताज्या बातम्याविद्युत तारेचा करंट लागून ३३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू; संशयास्पद मृत्यूची चौकशी...

विद्युत तारेचा करंट लागून ३३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू; संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याची गावकऱ्यांची मागणी

आशिष कोटकर (वरोरा-भद्रावती प्रतिनिधी) : वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कोसरसार बीटमधील मकसूर गावात ३३ वर्षीय युवा शेतकरी कवडू शंकर भटकर यांचा जिवंत विद्युत तारेचा करंट लागून संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, कवडू भटकर हे काल सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास “शेतात जातो” असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाहीत. बराच वेळ उलटल्यानंतरही संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी त्यांचा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोनला रिंग जात होती, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे चिंताग्रस्त कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली.

सायंकाळी सुमारे ७ वाजता त्यांच्या मालकीच्या शेतात शोध घेतला असता ते जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या एका हातात विद्युत तार पकडलेली होती. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने शेगाव पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोसरसार बीटचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

गावकऱ्यांच्या अंदाजानुसार ही घटना दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली असावी. मात्र मृत्यूची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे हा अपघाती मृत्यू आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, शेगाव पोलीस स्टेशनकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आवळगाव येथे ‘महाराजस्व समाधान शिबीर’ उत्साहात;५२६ लाभार्थ्यांना शासकीय दाखल्यांचे वाटप,

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज...

सुशी येथे ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

0
 गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  तालुक्यातील सुशी येथे आयोजित ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी ह.भ.प....

भीम जयंतीनिमित्त दौंडमध्ये ‘भीम पँथर गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त दौंड शहरात न्यू महाराष्ट्र पँथर सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य...

सीबीएससी दहावीच्या परीक्षेत पीएमश्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) शैक्षणिक सत्र 2025–26 चा दहावीचा निकाल जाहीर होताच बीड जिल्ह्यातील गढी (शिवाजीनगर) येथील पीएमश्री जवाहर...

शिक्षण विभागाचा बोगस कारभार खपवून घेतला जाणार नाही- आमदार सत्यजीत तांबे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) :  राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या अंधाधुंदी, गोंधळ आणि प्रशासकीय कामकाजाविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त यांना...

error: Content is protected !!