Homeताज्या बातम्यासातव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू – एका बिल्डरवर गुन्हा, दुसरा अजूनही 'सेफ'!...

सातव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू – एका बिल्डरवर गुन्हा, दुसरा अजूनही ‘सेफ’! बाणेर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह…

सातव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू – एका बिल्डरवर गुन्हा, दुसरा अजूनही ‘सेफ’! बाणेर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह…

पुणे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो)– बाणेर येथील वृंदावन ब्लिस या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून झालेल्या कामगाराच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग असतानाही केवळ एका बिल्डरवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसरा बिल्डर अद्याप कारवाईपासून सुटलेला आहे.

सदर प्रकरणात झारखंडमधील अजित वसेणलाल बघेल (वय २५) या कामगाराचा मृत्यू झाला होता. वृंदावन ब्लिस या साईटवर गेल्या वर्षभरापासून तो काम करत होता. १० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेदहा वाजता काम करत असताना तोल जाऊन तो सातव्या मजल्यावरून खाली पडला आणि जागीच ठार झाला.

या अपघातानंतर उपनिरीक्षक शिवाजी रायगुडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून बिल्डर उत्तम रमणिक मकवाना यांच्यासह ठेकेदार, साइट इंजिनीअर आणि प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला. मात्र आश्चर्य म्हणजे, दुसरे बिल्डर उमेश राजेंद्र बोरा यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, जरी ते तन्मय कन्स्ट्रक्शनचे सहमालक असल्याचे कागदपत्रातून स्पष्ट होत असले तरी गुन्हा दाखल झाला नाही. तसेच या प्रकरणात पोलीस उप निरीक्षक रुपेश चोळके हे तपास करत आहेत. मात्र आज सहा महिने उलटून गेले तरी त्यांना ही बाब का निदर्शनास आले नाही यामागे खूप मोठा रहस्य दडलय

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…

या प्रकरणात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे खुलासा मागण्यासाठी ईमेल पाठवण्यात आला होता. त्यांनी कोणतेही उत्तर 8 ते 10 दिवस दिले नाही नंतर सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून सातत्याने त्यांना फोन वरून माहिती देण्यात सांगितले त्यावर त्यांनी “तपास सुरू आहे दोषींवर कारवाई केली जाईल” एवढेच सांगून थातूरमातूर उत्तर दिले. पण सूत्रांची माहीती सांगते की, काही पोलीस अधिकारी संबंधित दुसऱ्या बिल्डराला मदत करत आहेत. त्यामुळेच त्याच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही, असा संशय उपस्थित होतो.

पुणे मनपाचे बांधकाम अधिकारी ही सामील…

या प्रकरणात पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागातील अधिकारी देखील या प्रकरणात बिल्डराला मदत करत असल्याचे माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. कारण बिल्डर याच्या बांधकामावर स्टे ऑर्डर देण्यात आलेले आहे. आणि ते स्टे ऑर्डर काढण्याकरिता बिल्डर पुणे महानगरपालिकेतील बांधकाम विभागाकडे जोर लावला असून अधिकारी देखील त्यांना मदत करत असल्याचे माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे.

सुरक्षा नियमांना हरताळ…

या दुर्घटनेत एक गोष्ट स्पष्ट आहे – बांधकाम साईटवर कोणत्याही प्रकारचे सुरक्षा प्रोटोकॉल उपलब्ध नव्हते. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट किंवा गार्ड रेल्स यांचा अभाव होता. त्यामुळे ही दुर्घटना घडली. मात्र, जबाबदारी दोघांच्याही बिल्डर्सवर असताना, एकावरच गुन्हा दाखल होतो आणि दुसरा मोकाट फिरतो, हे तपास यंत्रणेवर संशय निर्माण करणारे आहे.

सामाजिक जबाबदारी की साठवणूक?

पोलीस यंत्रणा जर निष्पक्षपणे काम करत नसेल, तर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच धोक्यात राहणार. न्यायालयात न्याय मागण्याआधीच पोलिसांकडून अर्धवट कारवाई ही कोणाच्या दबावामुळे केली जाते का, हा प्रश्न उपस्थित होतो.

प्रायव्हेट कंपलेंट दाखल करणार – मुज्जम्मील शेख

याप्रकरणी हिंदी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मुज्जम्मील शेख यांनी माहितीचा अधिकारातून पुणे महानगरपालिकेतून सर्व कागदपत्र काढलेली असून त्यांनी सांगितले की, या प्रकरणात खूप जास्त प्रमाणात तफावत आहेत आणि पोलिसांनी या प्रकरणात जाणून-बुजून काहींना सूट दिली असल्याची निदर्शनास आले आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार देखील झाला आहे. पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे. याप्रकरणी जर दुसऱ्या बिल्डरावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊन प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करणार आहे. तसेच संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार पोलीस महासंचालक यांच्याकडे करणार असल्याचे शेख यांनी सांगितले आहे.

‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. आणि प्रशासनाने लवकरात लवकर पारदर्शक चौकशी करावी, ही आमची भूमिका आहे.

क्रमशः भाग 1

लवकरच भाग 2 मध्ये मोठे गौप्यस्फोट आणणार समोर…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!