Homeक्राईमDelhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवणारा डॉ. उमर नबीची ओळख...

Delhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवणारा डॉ. उमर नबीची ओळख पटली; ‘६ डिसेंबर बदला’ घेण्यासाठी मोठा कट.

Times of Maharashtra Desk, Pune : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी ६:५२ वाजता झालेल्या कार बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या भीषण घटनेत एका ३५ वर्षीय व्यक्तीसह मृतांचा आकडा वाढून आता तेरा झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या दोन दिवसांनंतर काल केंद्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या घटनेचा तीव्र निषेध करत हा स्फोट राष्ट्रविरोधी शक्तींनी घडवलेला घृणास्पद दहशतवादी हल्ला असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या सन्मानार्थ दोन मिनिटे शांतता पाळण्यात आली आणि हल्लेखोर व त्यांचे साथीदार यांना लवकरात लवकर पकडून मृतांना न्याय मिळवून देण्याचे निर्देश देण्यात आले. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनीही या हल्ल्याला दहशतवादी हल्ला ठरवून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दहशतवादविरोधी यंत्रणांच्या तपासामध्ये या हल्ल्यामागील भयानक कट उघडकीस आला आहे. स्फोट झालेल्या Hyundai i20 कारमधील व्यक्तीची ओळख डॉ. उमर नबी म्हणून पटली आहे. तो हरियाणातील फरिदाबाद येथील अल-फलह युनिव्हर्सिटीमध्ये सहायक प्राध्यापक होता. उमर नबी हा जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी आहे. प्राथमिक तपासानुसार, हा हल्ला पाकिस्तान मधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाच्या व्हाईट-कॉलर दहशतवादी मॉड्यूलने केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडण्याचा बदला घेण्यासाठी दिल्लीतील ६ ठिकाणी समन्वित पद्धतीने स्फोट घडवण्याचा आणि त्यात एकूण ३२ कार वापरण्याचा हा कट होता. मात्र, स्फोट घडवण्यापूर्वीच त्याचे काही साथीदार पकडले गेल्यामुळे डॉ. उमर नबीने घाबरून लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये बॉम्ब न फोडता गर्दीच्या ठिकाणी अकाली स्फोट घडवला असे मानले जात आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. स्फोटाच्या ठिकाणापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर नवी लाजपत राय मार्केटमधील एका दुकानाच्या छतावर पोलिसांना तुटलेला मानवी हात सापडला आहे. जो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच तपासादरम्यान हल्ल्यात वापरल्या गेलेल्या आणखी तीन गाड्यांचा शोध लागला आहे. ज्यात फरीदाबादमधून जप्त केलेली Ford EcoSport आणि Maruti Brezza यांचा समावेश आहे. या गाड्या स्पोटक सामग्री वाहतुकीसाठी वापरण्यात आल्या होत्या. स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटसह उच्च दर्जाच्या स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली असून, लाल किल्ला मेट्रो स्टेशन पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि काउंटर इंटेलिजन्स विंगनेही या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित असल्याच्या संशयावरून काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!